Rain Updates: नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात दाणादाण

सलग पाच दिवसांपासून पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, इगतपुरी व कळवण तालुक्यात अतिवृष्टी (Extremely Heavy Rain) होत आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यातील पेठ व कोहोर महसूल मंडळात २१३.३ मिलिमीटर इतका झाला.
Extremely Heavy Rain
Extremely Heavy RainAgrowon
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात आदिवासी भागात प्रामुख्याने सुरगाणा, पेठ तालुक्यात अतिवृष्टीने (Extremely Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी घरे पडली, झाडे जमीनदोस्त झाली. तसेच घाटातील दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. शेतीचे बांध फुटून होत्याचे नव्हते झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील अलंगुन येथील बंधारा फुटून गावात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सलग पाच दिवसांपासून पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, इगतपुरी व कळवण तालुक्यात अतिवृष्टी (Extremely Heavy Rain) होत आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यातील पेठ व कोहोर महसूल मंडळात २१३.३ मिलिमीटर इतका झाला. जिल्हाभरात २५ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy Rain) तालुक्यातील अलंगुण गावाशेजारील बंधारा फुटल्यामुळे हे पाणी गावात शिरले. यात अनेकांची मातीची कौलारू घरे पडली. पाण्यासोबत गाळ वाहून आल्याने येथे सर्वत्र चिखल झाला आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने गावातील विजेचे खांब कोसळले आहेत. तर ओढ्याच्या काठावरील झाडे, झुडपे उन्मळून पडली.

पेठ तालुक्यातील जोगमोडी, करंजाळी, कोहोर परिसरात पूरपाण्यात भात, नागली वरईची रोपे वाहून गेलीय तर पाण्याखाली गेलेली रोपे खराब होत आहेत. शेतजमिनी व खाचरांचे बांध फुटल्याने मोठे नुकसान आहे. यामध्ये टोमॅटो, भोपळा, वांगी या प्रमुख भाजीपाला (Vegetable Crops) पिकांना फटका बसला आहे.

धरणांचा पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) मुसळधार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठा (Water Storage) ७३ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत आळंदी, वाघाड, ओझरखेड, हरणबारी, केळझर ही धरणे १०० टक्के भरली आहे. धरणांत पाण्याची अवाक कायम असल्याने गंगापूर, आळंदी, पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर या १२ धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

Extremely Heavy Rain
Sugarcane FRP : राज्यात १३७ कारखान्यांकडून ‘एफआरपी’ची रक्कम थकीत

पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान

- निफाड तालुक्यातील कारसूळ पाझर तलाव फुटल्याने रस्ता गेला वाहून

- त्र्यंबकेश्‍वर, सुरगाण्यातील प्रत्येकी दोघे, तर नाशिक, दिंडोरी व पेठमधील प्रत्येक एक जण वाहून गेला. बालकाचा मृतदेह सापडला असून, इतरांचा शोध सुरू

- इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, देवळा, कळवण व सुरगाण्यात ८४ घरांची अंशतः व एका घराची पूर्णतः पडझड

Extremely Heavy Rain
समुदायातील जिवाणू वेगळे ओळखण्यासाठी ‘इमू’ उपयुक्त

- दिंडोरीतील सात व सुरगाण्यातील तीन रस्ते पाण्याखाली, एके ठिकाणी झाड कोसळल्याने वाहतूक अन्यत्र वळण्यात आली

- सुरगाण्यातील अंगणवाडीची भिंत कोसळली तसेच एक बैल ठार

- निंबोळा येथील गिरणा नदीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने शेतीचे नुकसान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com