
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात किसान सभेच्या वतीने भुदरगड तालुक्यातील देवस्थान जमीन कसणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. उदय नारकर यांनी देवस्थान जमीन कसणाऱ्या जनतेसोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत राहू. 'किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई आणि अकोला ते लोणी या दोन लाँग मार्चमध्ये देवस्थान इनाम जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश केला जाणार असल्याची ग्वाही नारकर यांनी काल संबोधित केले.
यावेळी नारकर म्हणाले की, या आंदोलनाला सामोरे जाताना राज्य सरकारच्या मंत्री महोदयांनी देवस्थान इनाम जमिनींबाबत कायदा करून ती जमीन असणाऱ्या संबंधित शेतकऱ्याच्या नावे करण्यात येईल, असे आश्वासन किसान सभेला दिले आहे.
तसेच दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे सात-बारावर संबंधित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करणे व वारसा नोंद करणे याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असेही स्पष्ट लेखी आश्वासन दिले होते.
परंतु, आश्वासने देऊन चार महिने झाले तरी अजून त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकार बरोबर संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही.
यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. अमोल नाईक, उपाध्यक्ष चंद्रकांत कुरणे, दिनकर आदमापूर, संग्राम मोरे यांनीही या मेळाव्यात मार्गदर्शन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.