Nipah Virus : केरळमध्ये निपाह संसर्गामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू

Nipah Virus Death : केरळमध्ये निपाह संसर्गामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
Nipah Virus
Nipah VirusAgrowon

Nipah Virus Latest Update : केरळमध्ये निपाह संसर्गामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. राज्य सरकारकडून संवेदनशील भागात सातत्याने चाचण्या घेतल्या जात असून रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरातच राहण्याची सूचना केली जात आहे.

खबरदारीचे उपाय म्हणून गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. कोझिकोडेच्या जिल्हाधिकारी ए. गीता यांनी फेसबुक पोस्ट करत शैक्षणिक संस्थांनी दोन दिवस ऑनलाइन वर्गाची व्यवस्था करायला हरकत नाही, असे म्हटले आहे. मात्र विद्यापीठाच्या परीक्षेत कोणताही बदल केलेला नाही, असे स्पष्ट केले.

Nipah Virus
Israel Agricultural Technology : इस्राईलमध्ये अनुभवले प्रगत कृषी तंत्रज्ञान

२४ वर्षीय आरोग्य कर्मचारी निपाहची लागण झालेली पाचवी रुग्ण आहे. यादरम्यान कोझिकोडलगत वायनाड येथे चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वायनाड प्रशासनाने पंधरा समित्या स्थापन केल्या असून निपाहचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. केरळ सरकारने म्हटले, की राज्यात आढळून आलेला संसर्ग हा बांगलादेशात सर्वप्रथम सापडलेला विषाणू आहे.

तो माणसातून माणसात पसरतो आणि त्याचा मृत्यूदर अधिक आहे. मात्र त्याचा फैलावाचा वेग कमी आहे, असेही नमूद करण्यात आले. राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्च जोखमीत असलेले सर्व ७६ जणांची प्रकृती स्थिती स्थिर असल्याचे सांगितले. १३ जणांत किरकोळ लक्षणे दिसली असून त्यांना आता रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तसेच नऊ वर्षाच्या मुलाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मुलांवरील उपचारासाठी आयसीएमआरकडून मोनोक्लोनल ॲटीबॉडी मागविण्यात आले आहे. निपाहसारख्या संसर्गजन्य आजारासाठी तो एकमेव प्रतिबंधक उपाय आहे, मात्र वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेले नाही, असेही त्या म्हणाल्या.

Nipah Virus
Agriculture Department : वीस उपसंचालकांना ‘एसएओ’पदी बढती

मेंदूला हानी पोचवणाऱ्या या संसर्गाच्या उद्रेकाच्या पाश्‍र्वभूमीवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीची माहिती देताना जॉर्ज म्हणाल्या, राज्यातील स्थितीवर सखोल चर्चा करण्यात आले. निपाह रोखण्यासाठी राज्यात उपायांची साधने उपलब्ध आहेत आणि त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरच्या अहवालातून केवळ कोझिकोडच नाही तर संपूर्ण केरळमध्ये निपाह पसरण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण संसर्गबाधित पहिला रुग्ण वनक्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात आढळून आलेला आहे.

आजाराचे गांभीर्य पाहता कोझिकोड प्रशासनाने सात ग्राम पंचायती अतानचेरी, मारुथोंकारा, तिरुवल्लूर, कुट्टियाडी, कयाक्कोडी, विल्यापल्ली, कविलुम्परा कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com