परभणी ः जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांमध्ये (small projects) सरासरी ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे.दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
सिंचन, पाणीपुरवठ्यासाठायासह बेसुमार उपसा सुरु असल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट सुरु आहे.
जिल्ह्यातील २२ पैकी १ प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यात राणीसावरगाव (ता.गंगाखेड) ८३ टक्के या तलावाचा समावेश पाणीसाठा आहे. एकूण ५ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के त्यात झरी (ता. पाथरी) ५२ टक्के, तांदूळवाडी (ता. पालम) ६७ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) ६३ टक्के, वडाळी (ता. जिंतूर) ६२ टक्के, पाडाळी (ता. जिंतूर) ७३ टक्के या तलावांचा समावेश आहे.
एकूण १४ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात पेडगाव (ता.परभणी ) २८ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) ३२ टक्के, टाकळगाव (ता. गंगाखेड) ३२ टक्के, कोद्री (ता. गंगाखेड ) ३६ टक्के, देवगाव (ता. जिंतूर) ४४ टक्के, जोगवाडा (ता. जिंतूर) २७ टक्के, बेलखेडा (ता. जिंतूर) ३९ टक्के, चारठाणा (जिंतूर) ४१ टक्के, चिंचोली (ता. जिंतूर) ३६ टक्के, आडगाव (ता. जिंतूर) ३५ टक्के, भोसी (ता. जिंतूर) ४३ टक्के, कवड (ता. जिंतूर) ३७ टक्के, मांडवी (ता. जिंतूर) ४० टक्के, दहेगाव (ता. जिंतूर) ३१ टक्के या तलावांचा समावेश आहे.
गतवर्षी (२०२१-२२) या कालावधीत लघूतलावांमध्ये सरासरी ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६८ टक्के पाणीसाठा आहे.
त्यात निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पात ६४ टक्के तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
गतवर्षी (२०२१-२२) या कालावधीत दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
आंबेगाव, केहाळ तलावात २५ टक्के पाणीसाठा...
दोन तलावांमध्ये ० ते २५ टक्के पाणीसाठा आहे. त्यात आंबेगाव (ता. मानवत) १८ टक्के, केहाळ (ता. जिंतूर) २५ टक्के या तलावांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.