Water Storage : निम्न दुधना प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हे धरण भरले होते. पावसाळ्यात अनेक वेळा धरणाच्या दरवाजाद्वारे नदी पात्रात विसर्ग करण्यात आला.
Lower Dudhana Project
Lower Dudhana ProjectAgrowon
Published on
Updated on

परभणी ः जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या (Lower Dudhana Water Project) धरणांमध्ये शुक्रवारी (ता. २७) सकाळी ६०.०८ टक्के जिवंत पाणीसाठा (Live Water Stock) होता. या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे (Canal Irrigation) तिसरे आवर्तन सुरू आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) हे धरण भरले होते. पावसाळ्यात अनेक वेळा धरणाच्या दरवाजाद्वारे नदी पात्रात विसर्ग करण्यात आला.

या धरणात १ जून २०२२ पासून येवा ३१९.१७८ दलघमी झाला. रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याव्दारे आवर्तने सोडण्यात आल्यामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे.

शुक्रवारी (ता. २७) सकाळी या धरणा १४५.५२३ दलघमी म्हणजेच ६०.०८ टक्के जिवंत पाणीसाठा होता. रब्बी हंगामातील सिंचनासाठी तिसरे आवर्तन सोडण्यात आले.

डाव्या कालव्याद्वारे १०० क्युसेक आणि उजव्या कालव्याद्वारे ९१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Lower Dudhana Project
Water Storage : खानदेशातील प्रकल्पात ६५ टक्क्यांवर पाणीसाठा

कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या आवर्तनाचे परिमाण ०.८३५७ दलघमी आणि उजव्याकालव्याव्दाद्वारे ०.७०४ दलघमी सोडण्यात आले.

बाष्पीभवनामुळे ०.१६३ दलघमी पाणीसाठा कमी झाला. बिगर सिंचन ०.०१७८ दलघमी पाणी वापर आहे. सांडव्याद्वारे १ जून २०२२ पासून आजवर २६२.०४४ दलघमी पाणी सोडण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com