Heritage Tourism : ऐतिहासिकस्थळी पर्यटक वाढविण्यासाठी प्रयत्न करा

औरंगाबाद : जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दरवर्षी या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे.
Heritage Tourism : ऐतिहासिकस्थळी पर्यटक वाढविण्यासाठी प्रयत्न करा
Published on
Updated on

औरंगाबाद : जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा (Historical Legacy) लाभलेला आहे. दरवर्षी या पर्यटनस्थळांना (Tourist Destination) भेट देणाऱ्या पर्यटकांची (Tourist) संख्या देखील मोठी आहे. अशा ऐतिहासिक वारशांची माहिती नागरिकांना द्यावी तसेच पर्यटकांची संख्या आणखी कशी वाढेल यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी दिले.

Heritage Tourism : ऐतिहासिकस्थळी पर्यटक वाढविण्यासाठी प्रयत्न करा
Heavy Rain : सटाण्यातील करंजाडी खोऱ्यात जोरदार पाऊस

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. १८) घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपायुक्त पराग सोमण, पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त श्रीमती वीणा सुपेकर, समीक्षा चंद्राकार, श्रीमती ॲलेस यावेळी बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी सादरीकरणाव्दारे सर्व विभागांच्या कामाची माहिती आयुक्तांना दिली.

आयुक्त म्हणाले, की वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. सर्व यंत्रणांनी दिलेल्या उदिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लागवड करावी, जनतेसाठी असणाऱ्या योजनांची विस्तृत दृष्टिकोन ठेवून अंमलबजावणी करावी, ‘लम्पी स्कीन’ बाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार काम करावे, फेरफार प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा, ई-पीक पाहणी महत्त्वाचा उपक्रम असल्याने माहिती संकलित करताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com