Kolhapur News : कणबरकर पुरस्कारातून दातृत्वाची परंपरा : पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराने दातृत्वाची परंपरा निर्माण केली आहे,’’ असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी येथे केले.
Shivaji University
Shivaji University Agrowon

Kolhapur News : ‘‘शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराने दातृत्वाची परंपरा निर्माण केली आहे,’’ असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य ‘रा. कृ. कणबरकर पुरस्कार-२०२३’ त्यांच्या हस्ते भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ व एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

Shivaji University
Kolhapur Apmc Election : कोल्हापूर बाजार समितीत पॅनेलबाबत नेत्यांचा सावध पवित्रा

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.

Shivaji University
Kolhapur Ambabai Rathotsav 2023 : करवीर निवासिनी आंबाबाईचा दिमाखदार रथोत्सव सोहळा

श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचा मी साक्षीदार आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा पुढे वाहून नेणारे अनेक पाईक या भूमीमध्ये निर्माण झाले.

त्यांच्या समृद्ध विचारांची परंपरा शिवाजी विद्यापीठ पुढे चालवत हीरक महोत्सव साजरा करत आहे, याचा अभिमान वाटतो.’’

डॉ. कदम म्हणाले, ‘दिवंगत बंधू पतंगराव व मी शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होतो. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्याचा केलेला हा गौरव आहे, अशी माझी भावना आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com