Kolhapur Ambabai Rathotsav 2023 : करवीर निवासिनी आंबाबाईचा दिमाखदार रथोत्सव सोहळा

Team Agrowon

१०० वर्षांची परंपरा असलेला डोळ्याचे पारणे फेडणारा आंबाबाईचा रथोत्सव सोहळा कोल्हापुरात दिमाखात पार पडला.

Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon

चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आंबाबाई वर्षातून एकदा नगरवासियांच्या भेटीसाठी मंदिराबाहेर पडते. ही परंपरा गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे.

Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon

यंदा देवीसाठी बनविलेल्या नव्या रथात आंबाबाई विराजमान झाली होती. देवस्थान समितीने रथोत्सवासाठी नवा सागवानी रथ तयार केला आहे.

Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon

करवीर निवासिनीचा रथोत्सव पाहण्यासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon

रथाला केलेल्या विद्युत रोषणाईमुळे रथात बसलेली आंबाबाईची मुर्ती विलोभनीय दिसत होती.

Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon

आंबाबाईच्या रथाच्या मार्गावरील रस्ते सुरेख रांगोळीसह फुलांनी सजवण्यात आले होते. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.

Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon

देवीची आरती झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन रथोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. आंबाबाईच्या रथापुढे मानाचा घोडा तर रथासोबत चोपदार, मशाल आणि सुरक्षा रक्षक होते.

Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon
Jotiba Yatra 2023 | Agrowon