Tractor March : चिखलीत शेतकरी संघटनेचा विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा

Farmers Protest : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे. या प्रमुख मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेने दिले.
Tractor March
Tractor MarchAgrowon

Buldana News : ‘‘ शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून २५ टक्के विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. कांदा निर्यात शुल्क रद्द करावे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने शेतकऱ्यांची जमीन जप्त करण्याची सुरू केलेली प्रक्रिया तत्काळ थांबवावी, या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता. ५) चिखलीमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला. दखल न घेतल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

Tractor March
Farmers Protest : अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळल्याने धडक मोर्चा

संघटनेने तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविले. दुष्काळाची परिस्थिती पाहता जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीबाबत नोटीस देणे थांबवावे. तसेच एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे नियमाप्रमाणे विमा कंपनीने २५ टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, सर्वत्र वन्य प्राण्यांमुळे होत असलेले शेतीमाल नुकसान भरपाईदेखील शासनाने शेतकऱ्यांना द्यावी.

Tractor March
Farmer Protest : शेतकरी आक्रोश मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्याकडे विविध मागण्या

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे. या प्रमुख मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेने दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ठोस कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही.

यावेळी रॅलीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देविदास कणखर, एकनाथ पाटील, समाधान कणखर, नामदेवराव जाधव, डॉ. सुरेश हाडे, शेनफडराव घुबे, भानुदास घुबे, भिका सोळंकी, धोंडू पाटील, विलास मुजुमले, विनायक सरनाईक, समाधान घुबे, भागवत घुबे, दिनकरराव घुबे, राजू शेटे, अच्युतराव पाटील, राजू थुट्टे, केशवराव पाटील, गणेश थुट्टे, नरहरी थुट्टे, गणेश थुट्टे, एकनाथ थुट्टे, कृष्णा थुट्टे, सचिन तरमळे, शंकर पैठणे उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com