Tomato Rate : सरकारची आडमुठी भूमिका शेतकरी आला मेटाकुटीला, दोन एकर टोमॅटो टाकला उपटून

Kolhapur Farmer : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील बाबासाहेब वळवाडे या शेतकर्‍याने दोन एकरांत केलेल्या टोमॅटोचे पीक उपटून टाकले आहे.
Tomato Rate
Tomato Rateagrowon

Tomato Price : मागच्या ४ ते ५ महिन्यांपासून टोमॅटोने शेतकऱ्यांचा सोन्याचे दिवस आणले होते परंतु सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे टोमॅटोच्या अचानक घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागच्या काही दिवसांपासून टोमॅटो अवघ्या कवडीमोल ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांने लावलेल्या पिकाचा खर्च अंगावर बसत असल्याने पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील बाबासाहेब वळवाडे या शेतकर्‍याने दोन एकरांत केलेल्या टोमॅटोचे पीक उपटून टाकले आहे. वळवाडे यांना मजूर खर्चही निघणे कठीण झाल्याने संताप व्यक्त केला.

मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट १५ तारखेपर्यंत टोमॅटोला चांगला दर मिळत होता. परंतु सरकारने वाढत्या टोमॅटोच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी परदेशातून टोमॅटो आयात करून नाफेडमार्फत बाजारात आणला. यानंतर देशभरात अचानक टोमॅटोचे दर उतरले. यामुळे टोमॅटोमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता परंतु सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकरी आज पुन्हा टोमॅटो रस्त्यावर फेकू लागला आहे.

दरम्यान टोमॅटो शेतीतून भरघोस उत्पन्न मिळेल, या आशेने शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्च करून १०० हून अधिक एकरात टोमॅटोची लागवड केलीय. परंतु अचानक टोमॅटोचे भाव टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पिकलेल्या मालासह टोमॅटोची रोपे शेतकरी तोडून टाकत आहेत.

Tomato Rate
Raju Shetti Kolhapur : गत हंगामातील चारशे रुपये न दिल्यास साखर अडवणार, राजू शेट्टींचा २ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम

टोमॅटो उत्पादक शेतकरी बाबासाहेब वळवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन एकरामध्ये टोमॅटो उत्पादन घेतले होते. करार पद्धतीवर त्यांनी दुसऱ्याची जमीन कसायला घेत जवळपास आतापर्यंत त्यांनी दिड ते दोन लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु काढलेला टोमॅटो बाजारात घेऊन गेल्यानंतर त्यांना २५ किलो टोमॅटोला फक्त ८० रुपये हातात येत असल्याची हकिकत त्यांनी सांगितली.

दरम्यान वळवाडे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पिक घेतले आहे परंतु दर नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची खंत वळवाडे यांनी व्यक्त केली.

जुलै महिन्यात टोमॅटोला सर्वात उच्चांकी दर मिळत होता. हा जर दिवाळीपर्यंत राहील अशी अपेक्षा होती. म्हणून जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात १ लाख ७५ हजार रुपये खर्चून टोमॅटोची लागवड केली. उत्पादन सुरू झाले आणि दर घसरले. कामगारांचा खर्चही निघत नसल्याने चालू टोमॅटो पीक काढून टाकण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com