Tomato Grower Farmers : साहेब काय सांगू लाखोंच नुकसान झालं ओ..., हाताशी आलेल्या टोमॅटो पिकाचे समाजकंटकांनी केलं नुकसान

Kolhapur District : कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडेवाडी येथे शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे लाखोंचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांने हंबरडा फोडला
Tomato Grower Farmers
Tomato Grower Farmersagrowon
Published on
Updated on

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या सांगवडेवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या देशभरात टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. अशातच शेतकरी दिनकर चव्हाण यांच्या शेतातील तोडणीसाठी आलेल्या टोमॅटो, कारले व मिरची तसेच संजय खोत यांच्या शेतातील वरणा पीके अज्ञात समाजकंटकांनी उपटून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकारामुळे शेतकरी दिनकर चव्हाण यांना अश्रू अनावर झाले होते. चव्हाण यांचे तब्बल २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले आहे. तर खोत यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान याबाबत दिनकर चव्हाण यांचे पुतणे किरण चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली असता ते म्हणाले की, आम्ही काबाड कष्ट करून दिड एकरमध्ये २० गुंठे टोमॅटो, २० गुंठे मिरची तर २० गुंठ्यात कारल्याचे पीक घेतले होते. यामध्ये अंदाजे त्यांना ३० लाखांचा नफा अपेक्षीत होता.

अशातच लांबलेला पाऊस, पाण्याची कमतरतेमुळे चव्हाण कुटुंबीयांनी रोपे जगवण्यासाठी भांड्यातून पाणी घालून हे पिक वाढवले होते. चव्हाण यांचे सुमारे १५ जणांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. तर संजय खोत यांचाही संसार शेतीवर अवलंबून आहे. मात्र या शेतकऱ्यानी जीवापाड जपलेले हे पिक रात्री समाजकंटकांनी उपटून टाकून त्याची नासधूस केली.

Tomato Grower Farmers
Kolhapur District Bank : पीककर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा बँकेचा डंका, २ हजार २८६ कोटींचे वाटलं कर्ज

सध्या टोमॅटोला असलेल्या उच्चांकी दर पाहता यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकाची झालेली हि वाताहत पाहून संपूर्ण चव्हाण कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.

दरम्यान या शेतीच्या आधारावर चव्हाण यांनी घराचे बांधकाम काढले होते अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या शेतीत विविध पीके घेत आर्थिक उत्पन्न वाढणव्याचा प्रयत्न होता परंतु हाताशी आलेलं पीक गेल्याने अख्ख चव्हाण कुटुंब हताश झालं आहे.

याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु पोलिसांनी समाधानकारक तपास न केल्याने चव्हाण कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली.

Tomato Grower Farmers
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ, शेतकरी संकटात अडकण्याची भिती

याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात एवढी मोठी घटना घडलेली असूनही तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

याबाबत माहिती मिळताच, आमदार ऋतुराज पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, यांनी ही घटनास्थळावर येत पाहणी केली. झालेली ही नासधूस संवेदनशील माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेली ही घटना धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी चव्हाण कुटुंब व खोत कुटुंबाला आमदार पाटील यांनी आर्थिक मदतही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com