Tomato Market : नाशिक बाजार समितीत टोमॅटोचा ‘लाल चिखल’

Tomato Market Rate : दरवर्षी दराच्या अपेक्षेने उन्हाळी हंगामात अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी टोमॅटो लागवड करत असतात. मात्र सध्या आवकेत वाढ झाल्याने टोमॅटोचे दर घसरले असून शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
Tomato Market
Tomato MarketAgrowon

Nashik News : दरवर्षी दराच्या अपेक्षेने उन्हाळी हंगामात अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी टोमॅटो लागवड करत असतात. मात्र सध्या आवकेत वाढ झाल्याने टोमॅटोचे दर घसरले असून शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. गुरुवारी (ता. १८) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला क्विंटलला किमान १०० ते कमाल ५०० रुपये, तर सरासरी ३०० रुपये दर मिळाले.

त्यामुळे खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाशिक बाजार समितीच्या पेठ रोडवरील आवाराच्या प्रवेशद्वारावरच टोमॅटो ओतून संताप व्यक्त केला. त्यामुळे येथे लाल चिखल झाल्याचे पाहायला मिळाले.

बाजार समितीत बुधवारी (ता. १७) रोजी ३१७६ क्विंटल आवक झाली होती. ते दुसऱ्या दिवशी त्यात मोठी वाढ होऊन ५९१८ क्विंटल आवक झाली.

त्यामुळे २, ७४२ क्विंटल आवक वाढल्याने दर कवडीमोल मिळाले. एकीकडे गेल्या काही वर्षांत खते, बियाणे व कीटकनाशकांच्या दरात मोठी वाढ होऊन उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.

Tomato Market
Tomato Crop Disease : टोमॅटो पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक

अशातच वाहतुकीसाठी इंधनाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर दुसरीकडे टोमॅटो तोडणी करून बाजारात आणला तर त्या वाहतूक खर्चालाही परवडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाची लाट आहे.

नाशिक बाजार समितीमध्ये नाशिक तालुक्यासह सटाणा, दिंडोरी, कळवण, सिन्नर, इगतपुरी तालुक्यांतून आवक होत असते. तर प्रामुख्याने गुजरात, पंजाब, राजस्थान, कर्नाटक व दिल्ली राज्यात माल जातो.

मात्र सध्या मागणी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढत असल्याने दरात घसरण झाल्याचे एकंदरीत स्थिती आहे.

मात्र मिळणाऱ्या सध्याच्या दरात उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी उच्चांकी दर मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड क्षेत्र वाढल्याची स्थिती आहे. मात्र दराने कोंडी केली आहे.

Tomato Market
Tomato Rate : आवक घटूनही टोमॅटो दरात घसरण

मार्केट बंदमुळे स्थिती

नागपंचमीला लागवडी झाल्यानंतर गिरणारे, पिंपळगाव, खोरीफाटा हे स्थानिक खरेदी केंद्र सुरू होतात. मात्र ते सध्या बंद असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आवक वाढली.

अमावास्या असल्याने गुजरात अहमदाबाद मार्केट बंद आहेत, मालाला उठाव मिळाला नाही, यामुळे बाजारभाव कोसळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पेठ रोडवरील मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावरच आणलेला टोमॅटो रस्त्यावर ओतून दिला.

मागील वर्षी उन्हाळ्यात टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा लागवड केली. मात्र परराज्यातील मालाची मागणी घटल्याने दर कमी झाले असून माल फेकून देण्याची वेळ आली आहे. मी स्वतः दोनशे क्रेट टोमॅटो आणलेला होता. मात्र उत्पादन खर्च, गाडीभाडे, मजुरी, हमाली याचे पैसे देखील बाजारभावातून मिळत नाही.
- महेश सोनवणे, शेतकरी, सटाणा
बाजार समितीच्या आवारात यावर्षी उन्हाळ्यात टोमॅटोची आवक वाढल्याने तसेच इतर बाजारपेठत टोमॅटोची मागणी नाही. त्यामुळे व्यापारी देखील टोमॅटो खरेदी करून काय करतील? शेतीमालाला भाव न देण्यामागे व्यापाऱ्यांचा कोणताही फायदा नाही.
- संदीप पाटील, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com