चालू वर्षीच्या हंगामात आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक (Tomato Crop) उभे केले. सततचा पाऊस, अनेक भागांत अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मर, करपा अशा रोगांच्या विळख्यात लागवडी (Tomato Cultivation) सापडल्या, असे असतानाही पीक संरक्षणावर (Crop Protection) खर्च वाढता असतानाही शेतकऱ्यांनी दोन पैशाच्या अपेक्षेने लागवडी जागवल्या. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत दराने साथ दिली. मात्र नोव्हेंबर सुरुवातीपासूनच आवक (Tomato Arrival) कमी होऊनही मागणी घटल्याने दराला (Tomato Rate) मोठा फटका बसत असल्याची स्थिती आहे.
ऑक्टोबर महिन्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये ४०० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे असलेले दर नोव्हेंबर महिन्यात १०० रुपये प्रतिक्रेटपर्यंत खाली आले आहेत. तर जिल्ह्यातील गिरणारे, पिंपळनारे फाटा, खोरी फाटा अशा व्यापारी खरेदी केंद्रावर २० ते ७० रुपये प्रतिक्रेट इतक्या खाली आल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.
चालू वर्षाचा हंगाम उत्पादनाच्या अंगाने अडचणीचा राहिला. हंगामात प्रतिकूल वातावरणात माल तयार करून बाजारात आणला. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
सप्टेंबर महिन्यात परराज्यांतील बाजारात मागणी असल्याने आवक वाढून दरही टिकून होते. मात्र नंतर आवक कमी होत असताना दराच्या अंगाने मागणी कमी झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यापूर्वी दरात सुधारणा होती. मात्र पीक संरक्षणावर खर्च वाढल्याने काही अंशी यापूर्वी फायदा झाला, अशी स्थिती आहे.
परराज्यांत स्थानिक मालाची आवक सुरू झाल्याचा परिणाम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यात दिवाळीपूर्व मागणी होती. मात्र, तेथील स्थानिक मालाचे उत्पादन हाती असल्याने नाशिक भागातून मागणी कमी झाल्याने पुरवठा कमी झाल्याचे समजते. त्यामुळे दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
पिंपळगाव बाजार समितीतील आवक व दर स्थिती
महिना...आवक(क्विंटल)...किमान...कमाल....सरासरी (दर प्रतिक्रेट-२०किलो)
ऑगस्ट...३, ९१, ५९६...३०...५४१...२६५
सप्टेंबर...१०, ६५, २८९...३१...७०१...३६०
ऑक्टोबर...९, ३४, ३२४...४१...८८१...४८०
नोव्हेंबर (ता.११ अखेर)...२, ३०, १२८...४१...४११...१९९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.