Tomato Cultivation : लांबलेल्या पावसामुळे टोमॅटो लागवडीला विलंब

Tomato Latest News: लांबलेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टोमॅटो आगारात लागवडीला विलंब झाला आहे. त्याचा थेट परिणाम हंगाम लांबणीवर पडण्यावर झाला.
Tomato
TomatoAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar : लांबलेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टोमॅटो आगारात लागवडीला विलंब झाला आहे. त्याचा थेट परिणाम हंगाम लांबणीवर पडण्यावर झाला.

अनेक ठिकाणी अजून लागवड सुरूच असून काही ठिकाणी टोमॅटो पीक फुलोऱ्यात आहे. त्यामुळे टोमॅटोला बाजारात चांगला दर मिळत असला तरी अपवाद वगळता बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हातात अजून उत्पादनच सुरू झाले नसल्याची स्थिती आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवडगाव, गवळीशिवरा, गाजगाव, आंबेलोहळ, देभेगाव, ताडपिंपळगाव, देवळाना, कन्नड, अंधानेर, बहिरगाव यासह वरुडकाजी, हिरापूर, महालपिंपरी, शेंद्रा, कच्ची घाटी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणारी ही लागवड १० जूनपर्यंत आटोपत असते.

परंतु यंदा लांबलेल्या पावसाने टोमॅटो रोप लागवडीत खोडा घातला आहे. शिवाय दर वाढल्याने शेतकऱ्यांचा कल टोमॅटो लागवडीकडे वाढल्याने रोप मिळण्याची ही अडचण झाली आहे. त्यामुळे जूनच्या १५ तारखेपर्यंत सुरू राहणारी लागवड जुलैची १५ तारीख आली तरी सुरू असल्याची स्थिती आहे.

Tomato
Tomato Rate : चिपळूणमध्ये टोमॅटो १२० रुपये किलो

माळीवाडगाव गवळीशिवरा गाजगाव आदी परिसरात २५ मे ते पाच जून दरम्यान लागवड झालेले टोमॅटोचे पीक आता फुलाच्या अवस्थेत आहे. या पिकासह त्यानंतर लागवड झालेल्या टोमॅटो पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याची कसरत टोमॅटो उत्पादकांना करावी लागते आहे.

Tomato
Tomato Rate : हळद, टोमॅटोमध्ये तेजी कायम

आणखी साधारणतः २० ते २५ दिवसांनी काही शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो उत्पादन सुरू होईल. हंगाम जोमात सुरू व्हायला किमान एक महिन्यापेक्षा जास्त अवधी लागू शकतो असं शेतकरी सांगतात. त्यामुळे टोमॅटो बाजारात भाव खात असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र त्यामधून काही पडण्याची आशा तूर्त तरी नाही.

लांबलेल्या पावसाने टोमॅटो लागवडीत खोडा घातला. महिनाभर लागवड लांबणीवर पडली. उपलब्ध पाण्याच्या भरवशावर ज्यांनी आधी लागवड केली त्यापैकी चार दोन लोकांचे उत्पादन सुरू आहे.
- संदीप गवळी, टोमॅटो उत्पादक, माळीवाडगाव
उपलब्ध पाण्याच्या भरवशावर दीड एकरावर टोमॅटो लावलाय. आणखी दीड एकर लावण्याची इच्छा आहे. आमच्या शिवारात अजून कोणाचे उत्पादन सुरू झाले नाही. पाऊस लांबणीवर पडल्याने टोमॅटो लागवडीत खोडा घातला गेला.
- प्रतापसिंह बिघोत, टोमॅटो उत्पादक, हिरापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com