Agriculture Vacancy : जलसंधारणाची ६७० रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेकडील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट- ब या संवर्गातील ६७० पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही सोमवारी (ता. १९) ठरवून देण्यात आला आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

औरंगाबाद : जलसंधारण विभागाच्या (Department of Water Conservation) अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेकडील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट- ब या संवर्गातील ६७० पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही सोमवारी (ता. १९) ठरवून देण्यात आला आहे.

Water Conservation
Water Supply : सतसाधक सहकारी पाणीपुरवठा संस्था संकटात

या संदर्भात महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने सोमवारी मृदा व जलसंधारण आयुक्त वाल्मी औरंगाबाद यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यासाठी वित्त विभाग सामान्य प्रशासन विभाग मृदा व जलसंधारण विभागाच्या या आधीच्या शासन निर्णयांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्या विषयांना अनुसरून मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब अराजपत्रित या संवर्गातील ६७० पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

Water Conservation
Water Scarcity : धुळे जिल्ह्यातील ९७ गावांत पाणीटंचाईचे संकट शक्य

यासाठी कालबद्ध कार्यक्रम सोमवारी (ता. १९) ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित ६७० पदे भरण्यासाठी आयुक्त वृद्ध व जलसंधारण यांनी नियुक्ती प्राधिकारी म्हणून वेळापत्रकाप्रमाणे कालमर्यादेत कार्यवाही करण्याची सूचनाही मृदा व जलसंधारण विभागाच्या पत्रातून करण्यात आली आहे.

त्यानुसार येत्या ३१ डिसेंबर पूर्वी निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध करावी, १ ते ३१ जानेवारी २०२३ दरम्यान अर्ज मागविणे, छाननी करणे व परीक्षेचे ओळखपत्र पाठविण्याची प्रक्रिया करावी. तसेच १५ मार्च ते ३० एप्रिल २०२३ या दरम्यान परीक्षा आयोजित करावी. १५ मे ते ३१ मे दरम्यान निकाल व त्यानुसार निवड सूची जाहीर करावी. तसेच १ जून वा त्यापूर्वी नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची सूचना करण्यात आली आहे. कालबद्ध कार्यक्रम पत्रासोबत ६७० पदाच्या भरती करता मान्यता दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तक्ताही सोबत जोडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com