Ratnagiri Weather Update: रत्नागिरीत वाऱ्यासह वादळी पावसाची हजेरी

हवामान विभागाचा अंदाज चिपळूण, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांत काही ठिकाणी खरा ठरला.
Rain Update Ratnagiri
Rain Update RatnagiriAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : हवामान विभागाचा (Weather Department) अंदाज (Rain Forecast) चिपळूण, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांत काही ठिकाणी खरा ठरला. शुक्रवारी (ता. ७) दुपारच्या सुमारास वादळी पावसाने (Rainfall) हजेरी लावली. वेगवान वाऱ्यासह काही काळ पडलेल्या मुसळधार सरींनी झोडपून काढले.

चिपळूण तालुक्यातील सती, चिंचघरी, अनारी, टेरव परिसरात वादळी वाऱ्यांनी दणका दिला. टेरव येथे वेगवान वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. साखरप्यातही पावसाने हजेरी लालली. यामुळे ठिकठिकाणी आंब्यांचे नुकसान (Mango Crop Damage) झाले आहे.

गेले काही दिवस वातावरणात उष्मा वाढलेला आहे. जिल्ह्याच्या काही भागात सकाळी धुके पडत होते. पुन्हा दुपारी उन्हाच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी अचानक आभाळ भरून आले.

त्यानंतर ढगांचा गडगडाट होऊन वेगवान वारे वाहू लागले आणि पावसाने सुरुवात केली. वेगवान वाऱ्यामुळे टेरव येथे घरावरील पत्रे उडाले. यामध्ये घराचे नुकसान झाले आहे.

Rain Update Ratnagiri
Crop Damage In Marathwada : वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने बाजरी आडवी

टेरवबरोबरच सती, चिंचघरी, अनारी परिसरातही तुरळक पाऊस झाला. टेरव येथे झालेल्या या प्रकाराची माहिती किशोर कदम यांनी शासकीय यंत्रणेला दिली. या परिसरातील आंबा, काजू, केळीच्या झाडांचेही नुकनास झाले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी सरपंच स्वप्नाली कराडकर यांना केली आहे.

तसेच पोफळीसह अलोरे, शिरगाव, नागावे, कोळकेवाडी, तळसर मुंढे, बेढाबे या वाशिष्ठीच्या खोऱ्यात सुमारे दहा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. पाऊस आणि ढगांचा गडगडाट सुरू होताच वीज गायब झाली.

दहा मिनिटे पाऊस कोसळल्यानंतर सोसाट्याचा वारा वाहिला. त्यामुळे अधूनमधून वीज गायब होत होती. वारा थांबल्यावर वीजपुरवठा सुरळीत झाला. वारा आणि वादळी पावसामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही.

Rain Update Ratnagiri
Crop Damage : पुणे जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान

राजापूरच्या पूर्व भागात पाचल परिसरात वेगवान वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला.

पाचल परिसरामध्ये दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन होते. दुपारी ४ च्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. अचानक वारा आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सुमारे दहा-पंधरा मिनिटे पाऊस पडत होता.

त्यामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. या अवकाळी पावसामध्ये सोसाट्याच्या वार्‍यामध्ये आंबा-काजू झाडावरील तयार फळे पडून बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले होते. गार वारेही वाहत होते. पण पावसाने हजेरी लावलेली नव्हती. संगमेश्वर, लांजा परिसरातही ढगाळ वातावरण होते.

Rain Update Ratnagiri
Unseasonal Rain Crop Damage : अस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल

साखरपा परिसरात शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक गडगडाट सुरू होऊन पावसाला सुरुवात झाली.

सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस या परिसरात पडला. प्रारंभी काही ठिकाणी गाराही पडल्या. त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता.

या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी फांद्या पडून नुकसान झाले. साखरपा परिसरात नुकतीच भाजावळींना सुरवात झाली होती. बऱ्याच शेतकऱ्यांच्या भाजावळी अद्याप बाकी होत्या.

आज झालेल्या पावसामुळे शेतात उतरलेले कवळ, पातेरा आणि गावात भिजून गेले आहे. त्यामुळे उर्वरित भाजावळींसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. साखरपा गाव तसेच कोंडगाव, मेढे, दाभोळे, कनकाडी या गावांमध्ये हा पाऊस पडला.

गुहागर तालुक्यातील तळवली येथे शुक्रवारी अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. देऊळवाडी येथील सखाराम डाकवे यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बागायतदारांची चिंता वाढली

आंबा हंगाम ऐन भरात असताना अवकाळी पावसाने लावलेली हजेरी बागायतदारांसाठी त्रासदायक ठरणारी आहे. झाडावर तयार झालेली फळे वेगवान वाऱ्यामूळे खाली पडून वाया गेली आहेत. यंदा उत्पादन कमी असल्याने बागायतदार चिंतेत आहेत. या परिस्थितीत पडलेल्या पावसाची भर पडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com