Gram Panchayat Election : नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तीन हजार अर्ज

नांदेड : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर्यंत पार पडली. यावेळी सरपंचाच्या १८१ पदांसाठी ७२५ तर सदस्यांच्या एक हजार ३९१ जागांसाठी तीन हजार ३२९ अर्ज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्याची माहिती मिळाली.
Gram Panchayats Election
Gram Panchayats ElectionAgrowon

नांदेड : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर्यंत पार पडली. यावेळी सरपंचाच्या १८१ पदांसाठी ७२५ तर सदस्यांच्या एक हजार ३९१ जागांसाठी तीन हजार ३२९ अर्ज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्याची माहिती मिळाली.

Gram Panchayats Election
Gram Panchayat Elections : पुणे जिल्ह्यात २२१ सरपंचपदांसाठी १,०५० अर्ज दाखल

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, धर्माबाद, उमरी, बिलोली, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा आणि देगलूर या १६ तालुक्यांतील तब्बल १८१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

Gram Panchayats Election
Gram Panchayats Election : सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ६,९५७ उमेदवारी अर्ज दाखल

या ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष नामर्निदेशन पत्र दाखल करण्यास सुरवात झाली. या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार आहे. सरपंच व सदस्य पदांसाठी चार हजार ५४ अर्ज प्राप्त झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदांसाठी प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी होत आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत करता येणार आहे. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com