
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. दरम्यान मागच्या २४ तासांत धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाचे पुन्हा तीन दरवाजे उघडले आहेत. यामुळे ५६८४ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत आहे.
हवामान खात्याकडून कोल्हापूरात आज ग्रीन अर्लट देण्यात आला असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
पाणलोट क्षेत्रात सरासरी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. काल रात्री ९ वाजता ३४ फूट २ इंचापर्यंत खाली आली. दरम्यान मागच्या २४ तासांत ४ फुटांनी पाणी कमी झाले. परंतु आज पुन्हा तीन दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २७ बंधारे पाण्याखाली कुंभी प्रकल्पांतर्गत कळे बंधाऱ्यावरील पाणी ओसरले आहे. यामुळे पेरण्यांच्या कामांना वेग आला. मागास होणाऱ्या पेरण्यांना पावसाळ्यानंतरही काळजी घ्यावी लागणार असल्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा आणि राधानगरी या दोन तालुक्यांमध्ये होत असतो परंतु कालपासून पावसाने बरीच उघडीप दिली आहे. चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यांतही दोन महिन्यांत सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला आहे. परिणामी जिल्ह्यातही सरासरीपेक्षा ३३ टक्के कमीच पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरी पाठोपाठ भुदरगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. या दोन महिन्यांत सरासरीच्या १३६ टक्के जादा पाऊस झाला. जुलै महिन्यात तर सरासरीच्या तब्बल १८९.२ टक्के जादा पाऊस झाला. जुलै महिन्यात ५२६.९ मि. मी. पाऊस पडतो. यावर्षी तो ९७३.७ मि.मी. इतका पडला. जून ते जुलै या कालावधीत एकूण ८६७.७ मि. मी. पाऊस होतो, यावर्षी या कालावधीत तो ११७८.५ मि. मी. इतका झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.