Poet Bahinabai Award : यंदाचा बहिणाबाई पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी देणार

Award For Agriculture : मागील वर्षापासून विद्यापीठाने ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ सुरू केला आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाई चौधरी (Poet Bahinabai Chaudhary) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे (Maharashtra University) दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्य पातळीवरील ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ (Bahinabai Award) या वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार आहे. त्यासाठी २७ मेपर्यंत विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहेत.

मागील वर्षापासून विद्यापीठाने ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ सुरू केला आहे. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिला पुरस्कार सामाजिक क्षेत्रासाठी जाहीर झाला होता आणि तो कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ला दिला होता.

Indian Agriculture
Agriculture Award : डॉ. सुरेंद्र काळबांडे यांना उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार

यंदाचा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी दिला जाणार आहे. कृषी उत्पादन, विस्तार, कृषी प्रक्रिया, पीक फेरबदल, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर, नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समाजाला झालेला उपयोग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य, फलोत्पादन, वनौषधी व सेंद्रिय पद्धती या कृषी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांना पुरस्कार दिला जाईल.

Indian Agriculture
Agriculture Award : कार्ड्‌स’चे कृषी पुरस्कार जाहीर

...असे आहेत निकष

पुरस्कारासाठीचे व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील असावी. व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीचे वय ४० वर्षांपेक्षा कमी नसावे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्या क्षेत्रात काम केलेले असावे. संस्था असेल, तर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्या संस्थेचे कार्यही त्या क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक असावे.

प्रस्ताव २७ मेपर्यंत पाठवावेत

‘‘राज्य पातळीवरील पुरस्कारासाठी विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहेत. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील अर्ज, पात्रता, नियमावलीची माहिती दिली आहे. तज्ज्ञ निवड समितीकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर पुरस्कार जाहीर केले जातील.

विशेष परिस्थितीत पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावाव्यतिरिक्त इतर योग्य आणि प्राप्त व्यक्ती अथवा संस्थेच्या नामांकनाचा विचार केला जाऊ शकतो. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत २७ मे आहे,’’ अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com