Onion Rate : शेतकरी अडचणीत असताना सरकार झोपले होते का?

मुख्यमंत्री नेहमी सांगतात की, सर्वसामान्य नागरिकांच्या मागे आहोत. तर त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या व्याख्येत शेतकरी येत नाही का? असा खडा सवालही त्यांनी केला.
Onion Rate
Onion Rate Agrowon

Maharashtra Budget Session 2023 मुंबई : ‘‘कांद्याचे दर (Onion Rate) पडल्यानंतर ‘नाफेड’ने कांदा खरेदी (Onion Procurement) केला नसतानाही सभागृहात चुकीची माहिती दिली.

कांदा उत्पादक अडचणीत आला तेव्हा सरकार झोपले होते का?, नाफेडकडून कांदा खरेदीसाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत, हे सरकारचे अपयश आहे,’’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी शुक्रवारी (ता. ३) विधानसभेत केली.

सहकार व पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर ते बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री नेहमी सांगतात की, सर्वसामान्य नागरिकांच्या मागे आहोत. तर त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या व्याख्येत शेतकरी येत नाही का? असा खडा सवालही त्यांनी केला.

Onion Rate
Onion Rate : उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा

मुंडे म्हणाले, ‘‘पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. पुरवणी मागण्यांतील कांदा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी निधी देण्यात आला आहे.

पण, कांदा उत्पादकाला कर्ज फेडायला सरकार काही देईल, असे वाटत नाही. शेतकऱ्यांनी एकरी ४० हजार रुपये खर्च करून कांदा लावला.

आता तोच कांदा एक आणि दोन रुपये क्विंटल विकला जात आहे. या प्रश्नात वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता. केंद्राकडे विनंती करून नाफेडमार्फत कांदा खरेदी करायला हवा होता. मध्यप्रदेशच्या धर्तीवर सरकारच्या तिजोरीतून भावांतर योजना सुरू करायला हवी होती.’’

Onion Rate
Onion Rate : ‘आमच्या जीवनात ना ‘अर्थ’ ना ‘संकल्प’

‘‘२ लाख ३८ हजार टन कांदा नाफेडने खरेदी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण ही आकडेवारी आक्षेपार्ह आहे. आजपर्यंत अशी खरेदीच झाली नाही. ही वर्षभराची आकडेवारी झाली आहे.

आजच्या तारखेपर्यंत २ लाख ३८ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी झाला असेल तर जी द्याल ती शिक्षा द्या. मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आकड्याची कांदा खरेदी झाली नाही. लेट खरिपातील किती टक्के कांदा खरेदी केला, याची माहिती दिली पाहिजे,’’ अशी मागणी मुंडे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com