Shoumika Mahadik : 'शौमिका महाडिकांकडून दूध उत्पादकांची दिशाभूल'

Gokul Milk Kolhapur : शौमिका महाडिक या संघाच्या दूध उत्पादकांची दिशाभूल करत असल्याचा पलटवार गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी केला आहे.
Shoumika Mahadik
Shoumika MahadikAgrowon
Published on
Updated on

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये कोणताही गैरकारभार झालेला नाही. झालेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून ४ संचालक निवडून आले आहेत. त्यापैकी ३ संचालक राजकारण विरहीत, गोकुळचे हित पाहून संघाच्या कामकाजात सक्रीय सहभागी आहेत. तर परंतु शौमिका महाडिक या संघाच्या दूध उत्पादकांची दिशाभूल करत असल्याचा पलटवार गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, शासकीय लेखा परीक्षणाला आमचा विरोध नव्हता परंतु संघाच्या संचालिका शौमिका महाडिक फक्त वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन हेतु परस्पर संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानेच आम्ही मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाडिक संघाच्या दूध उत्पाद्कांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी सर्वात प्रथम आपण विरोधक आहोत या भूमिकेतून बाहेर यावे आणि आपला विरोधाचा दृष्टीकोन बदलून गोकुळच्या विकासात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि गोकुळच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.

गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादकांसाठी भरीव व उल्लेखनिय कामगिरी होत असून संघाच्या कारभाराचे अवलोकन करून लेखापरिक्षकांनी ‘अ –वर्ग’ दिला आहे. याची आवर्जून नोंद घेणे गरजेचे आहे. दूध उत्पादक शेतकरी व गोकुळचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ संघ हिताच्या योजना आखत असल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.

दराबाबत चर्चा होऊन दर निश्चित केले जातात व ज्यांचा दर कमी असेल त्यांना कामाचा ठेका दिला जातो. ही कार्यप्रणाली पूर्वीप्रमाणेच आजही पारदर्शक पद्धतीने केली जाते. प्रतिबंधित उपाययोजना आखण्यात गोकुळ दूध संघाने कुठेही हलगर्जीपणा केला नाही.

सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बरोबरीने गोकुळने दूध उत्पादकांना व शेतकऱ्यांना सुविधा पुरविल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपाययोजनासंबंधी चर्चा केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून निवेदन दिले. त्यानुसार तत्काळ कार्यवाही होऊन आर्थिक मदत देणेबाबत शासन आदेश काढण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com