Cotton Thief
Cotton ThiefAgrowon

Cotton Thief : शेतातील कापूस चोरीचे प्रकार वाढले

बाजारात यंदा कापसाला चांगले दर मिळत असल्याने चोरट्यांची नजर आता शेतकऱ्यांच्या शेतांवर गेली आहे.
Published on

संग्रामापूर, जि. बुलडाणा ः बाजारात यंदा कापसाला चांगले दर (Cotton Rate) मिळत असल्याने चोरट्यांची (Cotton Thief) नजर आता शेतकऱ्यांच्या शेतांवर गेली आहे. तालुक्यात पातुर्डा बुद्रुक परिसरात कापूस चोऱ्यांचे प्रमाण वाढले. या भागात आतापर्यंत पाच ते सहा शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस (Cotton) चोरी गेला असून, दोघांनी पोलिसात तक्रारसुद्धा केली आहे.

Cotton Thief
Cotton Rate : कापसाचे दर वाढण्याची शक्यता

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील पाइप, कृषिपंप, ठिबक-स्प्रिंकलरचे साहित्य या भागात चोरीला जात होते. पण चोरटे आता त्याही पुढे निघाले असून थेट पिकावरच हात साफ करीत आहेत. या भागात खरिपात कपाशीची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे. यंदा सततच्या पावसाने कपाशीचा उतारा कमी आहे. बाजारात दर चांगले असल्याने चोरटे कापूस चोरीच्या मार्गावर लागले आहेत. गेल्या १५ दिवसांत पातुर्डा परिसरात पाच ते सहा शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस चोरीला गेला आहे.

येथील भास्कर सुगदेव आढाव यांचे खेळ दळवी शिवारात शेत असून त्यांनी तीन एकरात कपाशी पेरली होती. गेल्या आठवड्यात ते मजुरांसह शेतात कापूस वेचणीसाठी गेले असता त्यांना शेतातील कपाशीवर उमललेला कापूस चोरीला गेल्याचे दिसून आले.

Cotton Thief
Cotton Cultivation : देर आए, दुरुस्त आए

किमान एक ते दीड क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरून नेला. बाजारभावाप्रमाणे सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले. गावातील श्रीकृष्ण ढोकणे यांचे खेल टाकळीपंच शिवारात दोन एकर शेत असून सोमवारी (ता. २८) त्यांच्या शेतातून किमान दोन ते अडीच क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरून नेल्याने २५ हजारांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com