Indian Navy : नौदलाची प्रतीकात्मक गुलामगिरी संपली

स्वातंत्र्यानंतरचा अपवाद वगळता नौदलाच्या ध्वजावर १९४७ पासून चिकटलेला ‘सेंट जॉर्ज क्रॉस’ आता हद्दपार झाला असून, त्या जागी तिरंगा व नवीन चिन्ह नौदलाच्या ध्वजावर विराजमान झाले आहे.
Indian Navy Flag
Indian Navy FlagAgrowon
Published on
Updated on

नवी दिल्ली ः ‘आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant) या स्वदेशी युद्धनौकेबरोबरच शुक्रवारी (ता. २) भारतीय नौदलाला नवा ध्वजही (Indian Navy Flag) मिळाला आहे. या ध्वजाच्या डाव्या कोपऱ्यावर असलेले नौदलाचे मानचिन्ह (क्रेस्ट) थेट छत्रपती शिवरायांच्या अष्टकोनी राजमुद्रेबरोबर नाते सांगणारे आहे. स्वातंत्र्यानंतरचा अपवाद वगळता नौदलाच्या ध्वजावर १९४७ पासून चिकटलेला ‘सेंट जॉर्ज क्रॉस’ आता हद्दपार झाला असून, त्या जागी तिरंगा व नवीन चिन्ह नौदलाच्या ध्वजावर विराजमान झाले आहे.

Indian Navy Flag
Soybean Diseases : सोयाबीनला या रोगांचा धोका ?

भारताच्या युद्धनौका, नौदल तळ आणि नौदल विमानतळांसह देशभरातील नौदलाच्या कार्यालयांवर आता नवीन ध्वज फडकेल. ‘शं नो वरुण:’ (पाण्याची देवता वरुण आपल्यासाठी शुभ ठरो) हे घोषवाक्य असलेल्या भारतीय नौदलाचा अधिकृत ध्वज अपवाद वगळता ७५ वर्षे गुलामीचेच चिन्ह मिरवीत होता.

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००१ मध्ये नौदलाच्या ध्वजचिन्हात बदल केला; मात्र काँग्रेसच्या यूपीए सरकारने २००४ मध्ये त्यावर पुन्हा सेंट जॉर्ज क्रॉसची प्रतिष्ठापना केली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून नौदलाचे बोधचिन्ह चार वेळा बदलले. आता त्यावरील क्रॉस हद्दपार झाला असून, छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेप्रमाणेच अष्टकोनी निळे प्रतीकचिन्ह ध्वजावर आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com