Crop Damage : पावसाने उडवली झोप

सोंगणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

अकोला ः या विभागात मागील काही तासांपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी दिल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सोमवारी (ता.१७) दुपारनंतर पाऊस होत असून प्रामुख्याने सोंगणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान (Soybean Damage) होऊ लागले आहे. सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या झाडांवरील शेंगांना कोंब फुटले आहेत.

Crop Damage
Soybean Rate: भुईमूग, सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार?

अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यात सोयाबीनचा हंगाम जोमाने सुरु झालेला आहे. पाऊस होत असल्याने हे काम ठप्प झाले आहे. अद्यापही पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. मंगळवारी सकाळी ११ वाजता जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे यंदा नुकसान होत आहे.

Crop Damage
Soybean Rate : नुकसानीनंतरही सोयाबीन दबावातच का?

सोयाबीनची काढणी प्रभावित होत आहे. शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन ओलेचिंब झाले. ढीग लावलेल्या सोयाबीनवर बुरशी चढत आहे. शेंगा पांढऱ्या पडू लागल्या. ओलसर वातावरणाने बहुतांश शेंगांना कोंबही निघत आहेत. काढणी केलेले सोयाबीन सुकवण्यासाठी शेतकरी प्रयत्नात आहेत. दर्जा घसरल्याचे कारण देत व्यापारी हे सोयाबीन तीन हजारांपासून विकत मागत आहेत.

सततच्या पावसामुळे कपाशीच्या पिकाचेही नुकसान वाढत आहे. परिपक्व झालेले बोंड काळे पडत आहेत. भिजलेला कापूस पिवळसर झाला. ओलसर कापूस वाळवण्यासाठी कसरत कराव्या लागत आहेत. व्यापारी हा कापूस पाच ते सात हजारांदरम्यान पडेल भावात मागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे सध्या खूप नुकसान होत आहे. सोयाबीन सोंगून शेतात पडून आहे. सोयाबीन भिजल्यामुळे कोंब फुटत आहेत. मक्याचीही अशीच अवस्था आहे. हंगाम जोरात असल्याने आधीच मजूर भेटत नाहीत. कापूस पावसाने भिजल्यामुळे वजन वाढले. सोयाबीनचे उत्पादन २५ ते ३० टक्के घटलेले आहे.

- श्रीकृष्ण शेलकर, शेतकरी, मोताळा जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com