

जालना : कडवंची शिवारातील काळ्या द्राक्षाची यंदा उत्पादनात (Black Grape Production) घट झाली आहे. तसेच प्रतिकूल हवामानाचा अनेक बागांना फटका बसला आहे. तूर्त द्राक्षाचे दर (Grape Rate) टिकून असल्याची स्थिती आहे. काळ्या द्राक्षाला १२६ रुपये प्रतिकिलो, तर इतर द्राक्षांना ४५ ते ६५ रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी आदी शिवारांत मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहे. शिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील सटाना, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार आहे.
जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात ऐरवी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या छाटण्या यंदा जवळपास ५ डिसेंबरपर्यंत चालल्या.
पहिल्या टप्प्यात अर्ली छाटण्या २५ टक्के, ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत जवळपास ६० टक्के, तर त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत जवळपास ३० टक्के झाल्या. एकूण भागांपैकी जवळपास ४० टक्के बागा हातच्या गेल्या.
डाऊनी, भुरी, घडकुज आदी आक्रमण द्राक्ष बागांवर झाले. मोठ्या प्रमाणात २६ जानेवारी नंतरच द्राक्ष बाजारात येण्याची अपेक्षा आहे. कडवंची शिवारात किमान दहा ते बारा एकरांवर काळे द्राक्ष लागवड शेतकऱ्यांनी केली होती काळ्या द्राक्षांना मागणी बऱ्यापैकी होते आहे.
याआधी विक्रम क्षीरसागर यांच्या काळात द्राक्षांना १२१ रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता त्यानंतर कडवंची येथीलच गणेश परकाळे यांच्या काळ्या द्राक्षांना १२४ रुपये प्रति किलोचा तर त्यानंतर काढणीस आलेल्या विष्णू क्षीरसागर यांच्या काळ्या द्राक्षांना १२६ रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे.
काळा द्राक्ष व्यतिरिक्त इतर द्राक्षांना मिळणारी दर प्रति किलो ४५ ते ६५ रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत. काही दिवसांपूर्वी हे दर जवळपास ५० ते ७० रुपये प्रति किलोपर्यंत होते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
माझ्याकडील एक एकर काळ्या द्राक्ष बागेत तीन ते चार वेळा तोडणी झाली. या द्राक्षाला १२४ रुपये प्रति किलोचा दर मिळाला. इतर द्राक्षांचे दर ४५ ते ६५ रुपये प्रति किलोदरम्यान आहेत.
- गणेश परकाळे, द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना
एक एकर काळी द्राक्ष घेतली होती त्याची तोडणी सुरू आहे. या द्राक्षांना जवळपास १२६ रुपये प्रति किलोचा दर मिळाला. यंदा किमान ४० टक्के द्राक्ष बागांना फटका बसला आहे.
- विष्णू क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.