Agriculture CET Exam : कृषी ‘पदव्युत्तर’च्या ‘सीईटी’ची प्रक्रिया सुरू

Agriculture Recruitment : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दहा विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या साडेतेराशेपेक्षा अधिक जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षेची (सीईटी-२०२३) प्रक्रिया सुरू झाली आहे.
Agriculture Education
Agriculture EducationAgrowon

Pune Recruitment News : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दहा विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या साडेतेराशेपेक्षा अधिक जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षेची (सीईटी-२०२३) प्रक्रिया सुरू झाली आहे.

जुलैमध्ये होत असलेल्या या सीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका एक ऑगस्ट रोजी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच निकाल ५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्याची तयारी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १३८७ जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

Agriculture Education
Agriculture And Rural Develpoment : महिलांमध्ये शेती, ग्रामविकासाचा चेहरा बदलण्याची ताकद...

यंदा सर्व विद्यापीठांच्या समन्वय समितीची बैठक झाल्यानंतर अंतिम जागा निश्‍चित होतील. तथापि, फारसा फरक पडणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी सांगितले, की महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या https://www.mcaer.org या संकेतस्थळावर सीईटीसाठी अर्ज भरण्याची सुविधा दोन मेपर्यंत सुरू राहील.

Agriculture Education
Indian Agriculture : महिलाच देतील कृषी क्षेत्राला नवी दिशा

परीक्षा २२ जुलै ते २४ जुलै २०२३ या दरम्यान घेतली जाणार आहे. कृषी विद्यापीठांमधील विविध विद्याशाखांचे पदवीधर व चालू शैक्षणिक वर्षाच्या अंतिम पदवी परीक्षेस बसणारे विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र असतील.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर असलेली माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी, असे परीक्षा मंडळाचे म्हणणे आहे. परीक्षेसाठी अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्कदेखील ऑनलाइन स्वीकारले जाणार असून, त्यासाठी ३ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. पात्र उमेदवारांना १२ जुलैपर्यंत परीक्षा प्रवेशपत्राची प्रिंट काढण्याची सुविधा संकेतस्थळावरच उपलब्ध राहणार आहे.

परीक्षेसंदर्भात शंका किंवा समस्या असल्यास विद्यार्थ्यांना ०२०२५५२८११९ किंवा ०२०२५५२८५१९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

परीक्षा घेण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत असल्यामुळे उमेदवारांनी या परीक्षेसंबंधित अर्ज मंडळाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com