Nagar DCC Bank : एकरकमी परतफेड योजनेतून सोसायट्यांना ऊर्जितावस्था मिळेल

Latest Agriculture News : यंदा दहा टक्के डिव्हिडंडचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक कर्जमर्यादा वाढविण्यासाठी संचालक मंडळ सकारात्मक आहे.
Nagar DCC Bank :
Nagar DCC Bank : Agrowon

Nagar News : ‘‘जिल्हा बॅंकेने २०१५ पूर्वीच्या थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना आणली आहे. त्यातून थकित ४०० सोसायट्यांपैकी ३०० संस्थांनाही ऊर्जितावस्था येईल. यंदा दहा टक्के डिव्हिडंडचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक कर्जमर्यादा वाढविण्यासाठी संचालक मंडळ सकारात्मक आहे. गट-तट न पाहता आधीच्या कारभाऱ्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार काम सुरू आहे,’’ असे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

नगर जिल्हा सहकारी बँकेची ६६ वी सर्वसाधारण सभा कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. १६) बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाली. उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक आमदार आशुतोष काळे, सीताराम गायकर, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, गीतांजली शेळके, अनुराधा नागवडे, आशाताई तापकीर, अमोल राळेभात, अंबादास पिसाळ, सुरेश साळुंके आदी उपस्थित होते.

Nagar DCC Bank :
Nashik DCC Bank : जिल्हा बँकेने सर्वसमावेशक ‘ॲक्शन प्लॅन’ करावा

कर्डिले म्हणाले, ‘‘खेळत्या भांडवलाची प्रकरणे मार्चनंतर केली जातील. कर्जदारांच्या सोयीसाठी सात-बारा, आठ ‘अ’ उतारे बँकेच्या शाखेतील एका क्लिकवर दिले जात आहेत. राज्यात क्रमांक एकची बँक आहे म्हणून काहीही करता येत नाही. आर्थिक शिस्त पाळूनच निर्णय घ्यावे लागतात. त्या शिस्तीमुळेच बँक टिकून आहे. बँकेला सतत ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाला आहे.’’

Nagar DCC Bank :
Nagar DCC Bank : पशुपालकांना २९६ कोटींच्या कर्जाचे वितरण

परदेश दौरा, वाहनावरून गदारोळ

सभेत सीताराम गायकर यांनी शाखा दुरुस्ती खर्च, परदेश दौऱ्याबाबत मांडलेल्या ठरावाला सर्वांनी मंजुरी दिली. यापूर्वीच्या संचालकांनीही असे अभ्यासदौरे काढले, परंतु त्यांनी परदेशात अभ्यास करून सेवा सोसायट्यांना नेमका काय फायदा झाला, हे सांगितले पाहिजे.‘तुम्हाला कोट्यवधींची वाहने कशाला पाहिजेत,’ या वाक्यामुळे गदारोळ झाला.

जिल्हा बॅंकेची स्थिती

शाखा २८७

ऑडिट वर्ग अ

भागभांडवल ३२६.७८ कोटी

ठेवी ८५५५.११ कोटी

निधी १०९१.४४ कोटी

गुंतवणूक ४४४५.२३ कोटी

खेळते भांडवल ११६६१ कोटी

बाहेरील कर्ज १५८७.४९

निव्वळ नफा ५२.०५ कोटी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com