Cotton Seed : कपाशी बियाण्यांसोबत लिकिंगचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला

Akola ZP : जिल्ह्यात कपाशीचे काही बियाणे मिळत नसून विक्रेत्यांकडून लिंकिंग होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सभेत झाला. सदस्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात कपाशीचे काही बियाणे मिळत नसून विक्रेत्यांकडून लिंकिंग होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सभेत झाला. सदस्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची शुक्रवारी (ता. १६) आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षा संगीता अढाऊ या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेला सुरुवात होताच बियाणे लिकिंगचा विषय सदस्यांनी उचलला.

Cotton Seed
Parbhani Cotton Procurement : परभणी बाजार समितीतील कापूस लिलाव खरेदी २१ जूनपासून बंद

प्री-मॉन्सून कपाशीची यंदा मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. कोरडवाहू क्षेत्रात पावसाअभावी पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. अशा स्थितीत पेरणीपूर्वीच बियाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. काही ठरावीक बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांनी केल्यास असे बियाणे नसल्याचे उत्तर विक्रेते स्पष्टपणे देतात.

Cotton Seed
Cotton Cultivation : अतिसघन पद्धतीने एक हजार एकरांवर होणार कापूस लागवड

बियाणे हवेच असेल तर दुसरे बियाणे सोबत घेण्याचा आग्रह केला जात आहे. हा लिंकिंगचा प्रकार सुरू असून, याबाबत कृषी विभाग गंभीर नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ यांनी केला. याबाबत जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी चांदूरकर, मोहीम अधिकाऱ्यांना कृषी केंद्रांची तपासणी करून कारवाईची सूचना केली.

या वेळी बैठकीला उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक, कृषी सभापती योगिता रोकडे, महिला व बालविकास सभापती रिजवाना परवीन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, गटनेता ज्ञानेश्‍वर सुलताने, मीना बावणे, चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन पुंडकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com