Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला

मॉन्सून सक्रिय असल्याने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यांच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी (ता. १६) या जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरूच होती.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

पुणे : मॉन्सून सक्रिय (Monsoon) असल्याने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यांच्या अनेक भागात पावसाचा जोर (Rain Intensity) वाढला आहे. शुक्रवारी (ता. १६) या जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरूच होती. पुणे, नगर, नाशिक, साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ()Rainfall In Dam Area) सुरू असलेल्या दमदार पावसामुळे प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणावर पावसाचा विसर्ग सुरूच आहे.

Rain Update
Rain Update : जायकवडीतून सहा तासात चार वेळा वाढविला विसर्ग

पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला असून, शुक्रवारी (ता. १६) दिवसभर संततधार सुरूच होती. पावसामुळे धरणातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, मुळशी, चासकमान या धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सीना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यातूनही पाणी नदीपात्रात जात आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Rain Update
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : मुंबई शहर : सांताक्रुझ ४०.

पालघर : डहाणू ६२, जव्हार ९६, मोखाडा ८०, वसई ५८, विक्रमगड ५८, वाडा ८२. रायगड : कर्जत ७७, खालापूर ७०, माथेरान १२३, पनवेल ९४, पेण ६५, रोहा ५७, सुधागडपाली ६७, तळा ७०, उरण ९७. रत्नागिरी : चिपळूण ५३, लांजा ५४. सिंधुदुर्ग : दोडामार्ग ४०, ठाणे : अंबरनाथ ७५, भिवंडी ७६, कल्याण ७६, मुरबाड ९३, शहापूर १३४, ठाणे ८५, उल्हासनगर ८८.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार : अक्कलकुवा ६०. नाशिक : इगतपुरी १२३, सुरगाणा ६०, त्र्यंबकेश्वर ५२. पुणे : लोणावळा कृषी १०९, वेल्हे ४८, सातारा : महाबळेश्वर ११३.

मुंबईसह उत्तर कोकणाला झोडपले.

सिंधुदुर्गात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ.

पुणे, नगर, नाशिकमध्ये जोर वाढला.

दिवसभर पावसाची संततधार सुरू.

प्रमुख धरणांतून विसर्ग वाढला.

मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com