
अकोला : अमरावती ते अकोलादरम्यान (Akola Amaravati) राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ५३ (पूर्वीचा ६) वर ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने (Rajpath Infracon) सलग १०९ तासांत ४२.२०० किलोमीटर बिटूमिनस काँक्रीटचे पेव्हिंग करून जगातील सर्व विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. बुधवारी (ता. ७) माना कॅम्प येथे ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे निर्णायक स्वप्नील डांगरीकर यांनी ‘राजपथ इन्फ्राकॉन’चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
अमरावती जिल्ह्यातील लोणीपासून अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंगच्या कार्याला ३ जून रोजी सकाळी ७.२७ वाजता सुरुवात झाली होती. बुधवारी रात्री ९.२० वाजता अकोला जिल्ह्यातील नवसाल येथे १०९.८८ तासांनी पेव्हिंगचे कार्य थांबवून ८४.४०० किलोमीटरचा नवीन विश्वविक्रम करण्यात आला. ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने विश्वविक्रम झाल्याचे घोषित केले. विदर्भातील ४५-४६ अंश तापमान, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा असतानाही मागील ५ दिवस सातत्याने आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, दाहक उन्हाच्या झळा सोसत, रात्रंदिवस काम सुरू होते.
अकोला-अमरावतीचे नाव या निमित्ताने सातासमुद्रापार पोहोचले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून ४ हॉटमिक्स प्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाइल फीडर, ६ टॅडेम रोलर, १ पीटीआर मशिन, १०६ हायवा, २ न्यूमॅटिक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह अभियंते, पर्यवेक्षक, मदतनीस, कारागीर असे एकूण ७२८ जण या कामासाठी कार्यरत होते. गेल्या सहा महिन्यांत रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला. गेली सहा-सात वर्षे रखडलेल्या रस्त्याचे या विश्वविक्रमाच्या निमित्ताने का होईना भाग्य पालटल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.