Mumbai APMC : अपात्र संचालकांची सुनावणी १८ जुलै रोजी होणार

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठ संचालकांच्या अपात्रतेचा खेळ अजूनही सुरू आहे. सहा संचालकांच्या अपात्रतेबाबत १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
Mumbai APMC
Mumbai APMCAgrowon

Mumbai APCM News : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठ संचालकांच्या अपात्रतेचा खेळ अजूनही सुरू आहे. सहा संचालकांच्या अपात्रतेबाबत १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सहा संचालकांच्या अपात्रतेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्यानंतर त्याविरोधात संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Latest Marathi News)

दरम्यान, हमाल आणि व्यापारी प्रतिनिधी असलेल्या दोन संचालकांच्या अपात्रतेबाबतही उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून त्याबाबतही उत्सुकता लागली आहे. बाजार समिती संचालक मंडळाचा कोरम नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून मासिक सभा झालेल्या नाहीत. परिणामी बाजार समितीचा कारभार ठप्प झाला आहे.

Mumbai APMC
Mumbai APMC : मुंबई बाजार समितीतील चार संचालकांना मुदतवाढ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील १० संचालकांचे स्थानिक बाजार समित्यांमधील सदस्यत्व संपुष्टात आल्याने त्यांना अपात्र करण्यात आले होते. याविरोधात संचालक मंडळाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुनावणी घेऊन मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा त्यांना पणन संचालकांनी अपात्र केले. त्यानंतर या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे या संचालकांचा मंत्रालय ते उच्च न्यायालय असा फेरा सुरू आहे.

Mumbai APMC
Mumbai APMC : मुंबई बाजार समितीचा कारभार अधांतरी

बाजार समिती प्रशासन पेचात

अपात्र केलेल्या सहा संचालकांच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र, या संचालकांनी कामकाजात भाग घ्यावा की घेऊ नये, याबाबत स्पष्टता नसल्याने समितीची सभा झालेली नाही. या संचालकांच्या याचिकेवर या आठवड्यात निकाल लागेल, अशी अपेक्षा होती.

मात्र या सुनावणीची तारीख १८ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे पणन संचालकांचा अपात्रता निकष ग्राह्य धरायचा की, उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत वाट पहायची, या पेचात बाजार समितीचे प्रशासन आहे.

बाजार समितीचा कारभार ठप्प

बाजार समितीत संचालक मंडळच कार्यरत नसल्याने कारभार ठप्प झाला आहे. एप्रिल महिना सुरू झाला असतानाही पावसाळी कामे सुरू झालेली नाहीत. अनेक मालमत्तांचे विक्री व्यवहार ठप्प आहेत.

बाजार समितीच्या काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. धोरणात्मक निर्णय झाला नसल्याने केवळ दैनंदिन कामकाज सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com