पन्नास टक्के सवलत योजनेला उरले दोन महिने : पडळकर

नांदेड : ‘‘महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ दोन महिने उरले आहेत. येत्या ३१ मार्चला मुदत संपणार आहे.
Fifty percent discount scheme for two months left: Padalkar
Fifty percent discount scheme for two months left: Padalkar

नांदेड : ‘‘महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ दोन महिने उरले आहेत. येत्या ३१ मार्चला मुदत संपणार आहे. एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांनी कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिले भरून ५० टक्के माफी मिळवावी’’, असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रेय पडळकर यांनी केले.

कृषिपंप वीज जोडणी धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत जनजागृती केली जात आहे. गावागावांत मेळावे घेऊन कृषीपंप वीज जोडणी धोरण प्रत्यक्ष शेतकऱ्‍यांपर्यंत पोहोचले. असे असले तरी ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे एक वर्ष निघून गेले आहे. आता केवळ दोन महिने उरले आहेत. नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषिपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १७११ कोटी माफ झाले आहेत. तर, सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत आहे. शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी १२४५ कोटी अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६०५ कोटी असे मिळून फक्त १८५० कोटी भरायचे आहेत. 

या देय रकमेपोटी आतापर्यंत ९३ कोटी ७४ लाखांचा भरणा वर्षभरात झाला आहे. वसुलीचे हे प्रमाण केवळ ५.०६ टक्के इतकेच आहे. योजनेसाठी पात्र ३ लाख ५ हजार ४५३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ३३ हजार ८३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. तरी केवळ ३ हजार ६०० शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे.

वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून नांदेड परिमंडळात आतापर्यंत १ हजार ५३० कृषिपंप वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. त्याबरोबरच उपकेंद्रांची क्षमतावाढही होणार आहे. नवीन रोहित्रे उभारण्यासह त्यांची क्षमतावाढही केली जाणार आहे. योजनेचा लाभ घेऊन उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांची बिले भरली. तर, शेतकऱ्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीज देणे शक्य होईल. या शिवाय नवीन शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडण्याही उपलब्ध होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com