
वर्धा ः महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथील आश्रमात (Wardha Sevagram Ashram) गो-शाळा सुरू केली. ८७ वर्षांची होत असलेली ही गो-शाळा (Go Shala) सध्या आर्थिक टंचाईच्या झळा सोसत आहे. ही समस्या मार्गी काढण्यासाठी आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने पर्यटक आणि दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
गोशाळा, गो-संवर्धन आणि गो-सेवा हे महात्मा गांधी यांच्या रचनात्मक कार्याचा एक भाग होता. याच कार्यातून महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात गो-शाळा सुरू केली.
त्यांनी सुरू केलेले गो-संवर्धनाचे कार्य आश्रमात आजही सुरू आहे. सद्यःस्थितीत येथे ७५ गायी आहेत. या गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनातून त्यांचेच भरणपोषण करणे कठीण होत आहे. आश्रम प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांत गोशाळा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या या गोशाळेतील एका गायीच्या संवर्धनासाठी वर्षाकाठी साधारणतः २१ हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे आश्रम प्रतिष्ठान सांगत आहे.
या गोशाळेतून रोज केवळ १६ लिटर दुधाचे उत्पादन होते. लोकसहभागातून उपलब्ध होत असलेल्या निधीतून एवढा खर्च शक्य नाही. महात्मा गांधींची गोशाळा बंद पडण्याची नामुष्की आश्रमावर येऊ नये याकरिता मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
शासनाचा मदतीस नकार
स्वावलंबी जीवनाची शिकवण देणारे सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम प्रतिष्ठान शासनाची कोणतीही मदत घेत नाही. येथील सर्व व्यवहार येथे तयार होत असलेल्या उत्पादनातून आणि पर्यटकांकडून येणाऱ्या मदतीतून होतो. यातून गो-शाळेचा पुरेपूर खर्च करणे अवघड होत आहे. यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.