Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले

गहू, कांदा, भाजीपाला पिकांना फटका; उत्पादन खर्चात वाढ
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

त्यातच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यास नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची घालमेल

गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यांत विविध ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली असून फळबागांचे मोठे नुकसान झाले.

या नुकसानीचे नुकतेच पंचनामे झाले असले तरी मदत अद्यापही मिळालेली नाही. त्यातच पुन्हा पाऊस झाल्यास शेतकरी चांगलाच अडचणीत येणार आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
Cloudy Weather : फळबाग उत्पादक धास्तावले

सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरीच्या २ लाख २९ हजार ७२२ हेक्टरपैकी एक लाख ६५ हजार ७९१ हेक्टर म्हणजेच ७२ टक्के पेरणी झाली आहे.

सध्या ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पिकाची वाढ पाण्याअभावी खुंटली आहे. मका पीक वाढीच्या, हरभरा घाटे भरण्याच्या, गहू पीक ओंबीच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.

मागील काही दिवसांपासून थंडी असल्याने पीक जोमदारपणे आले आहे. परंतु दोन दिवसांपासून अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी कमी थंडी आहे.

यामुळे गहू, कांदा पिकांना फटका बसत आहे. गहू पिकांवरही रोग, किडीने आक्रमण केले आहे.

ढगाळ हवामानामुळे पिकांवर प्रामुख्याने गव्हावर तांबेरा, कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अळ्या, रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.

याबरोबरच भाजीपाला यासारख्या पिकांना देखील फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील वातावरणात काही प्रमाणात बदल झाला आहे. ऊन, ढगाळ हवामान, कमी-अधिक थंडी यामुळे आंबा, द्राक्षे, डाळिंब पिकांना अधिक धोका पोहचतो. याशिवाय हरभरा, गहू, ज्वारी पिकांवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सध्या अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.
- ज्ञानेश्वर बोठे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com