Bhuvikas Bank : भूविकास बॅंकेच्या थकित कर्जाचा बोजा उतरणार

Agriculture Credit : भूविकास बॅंकेकडून दीर्घ मुदती कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा लवकरच हटणार आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : भूविकास बॅंकेकडून दीर्घ मुदती कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा लवकरच हटणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १०४६ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शेतीच्या विकासाकरिता दीर्घकालीन पीककर्ज भूविकास बॅंक अदा करीत होती. मात्र या बॅंकेचा वित्तपुरवठा थांबला. यानंतर बॅंकेच्या कर्जवाटपाची प्रक्रिया थांबली होती. कर्जवसुलीअभावी ही बॅंक अवसायनात निघाली. असे असताना शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा मात्र कायम होता.

Crop Loan
Crop Loan : जून- 2023 अखेर खरीप पिक कर्ज वाटपाचे करा ; जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बॅंकांना आदेश

परिणामी, नव्या पीककर्जापासूनही त्यांना वंचित राहावे लागत होते. त्याची दखल घे भूविकास बॅंकेतील कर्ज प्रकरणात ९ नोव्हेंबर २०२२ ला कर्जमाफी करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले.

यानंतर भूविकास बॅंकेतील थकित कर्ज प्रकरणात सहकार विभागाकडून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. गेल्या २५ वर्षांतील सर्व थकित शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. या प्रकरणात सातबारावरील बोजा कमी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.

Crop Loan
Crop Loan : अकोला जिल्ह्यात ४९ टक्के कर्ज वाटप

जिल्हा सहकारी कृषी, ग्रामीण बहुद्देशीय विकास बॅंक मर्या यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणात सातबारावरील नोंदी कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पडताळणीत २५ वर्षा १०४६ शेतकरी थकबाकीदार असल्याची माहिती समोर आली. त्यांच्याकडे ११ कोटी ९१ लाख ८९ हजार रुपयांचे कर्ज थकले होते. या सर्व कर्जाचा बोजा कमी करण्याची करवाई सुरू करण्यात आली आहे.

...अशी आहे थकित शेतकरी संख्या

यवतमाळ ८१

बाभूळगाव २९

आर्णी ५५

बाभूळगाव २९

कळंब ५३

दारव्हा १०४

बोरी ३३

नेर ११०

दिग्रस ८८

पांढरकवडा २८

राळेगाव ५५

घाटंजी १५७

वणी ७

मारेगाव ८५

महागाव ५८

पुसद ४०

उमरखेड ६३

भूविकास बॅंकेच्या थकित कर्जदारांच्या सातबारावरील बोजा कमी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. लवकरच या नोंदी सातबारावरून कमी होतील.
- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com