Crop Loan : अकोला जिल्ह्यात ४९ टक्के कर्ज वाटप

Kharif Season : आगामी खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, पैशांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Akola News : आगामी खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, पैशांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहे. या हंगामासाठी बँकांना १२७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून आतापर्यंत सुमारे ४९ टक्के रक्कम वाटप झाली आहे. यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून या बँकेने लक्ष्यांकाच्या तुलनेत ७५ टक्के वाटप पूर्ण केले.

खरीप हंगामात कृषी निविष्ठा खरेदी, शेतीची मशागत व व्यवस्थापनाचा खर्च करण्यासाठी पीककर्ज दिले जाते. नवे आर्थिक वर्ष सुरू होताच एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होत असते.

Crop Loan
Kharif Crop Loan : परभणी जिल्ह्यात पीककर्ज मागणीसाठी ऑनलाइन अर्ज

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील सुमारे एक लाख ४७ हजार ९५० खातेदार शेतकऱ्यांना सुमारे १२७५ कोटी रुपये वाटपाचा लक्ष्यांक घेण्यात आला आहे. सध्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची तयारी सुरू झालेली आहे. शेतकरी प्रामुख्याने पैशांच्या तजवीजमध्ये व्यस्त झाले आहेत. पीककर्ज मिळण्यासाठी बँकांच्या संपर्कात आहेत.

जिल्हा बँकेला यंदाही सर्वाधिक म्हणजे ६०५ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे लक्ष्य देण्यात आलेले आहे. बँकेने या पैकी ४५७ कोटींचे वितरण करीत सुमारे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अशा प्रकारची कामगिरी करण्यात बँकेने आघाडी घेतली आहे. ग्रामीण बँक सुद्धा पीककर्ज वाटपात आघाडीवर आहे.

१३० कोटी रुपये पीककर्ज वाटप करण्याचा लक्ष्यांक या बँकेला दिला असून आतापर्यंत ८१ कोटी ६५ लाख रुपये वाटप झाले. ६३ टक्के पीककर्ज या बँकेने वाटप केले आहे. सर्व बँका मिळून आतापर्यंत ६० हजार ९६६ शेतकऱ्यांना ६१८ कोटी ३८ लाख रुपये पीककर्जाचे वाटप झाले आहे.

Crop Loan
Crop Loan : यंदा १ हजार ९२९ कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट

राष्ट्रीयकृत, खासगी बँका पिछाडीवर

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात नेहमीप्रमाणे राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँका मागे आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांमधून आजवर केवळ ८० कोटींचे पीककर्ज वाटप करीत १६ टक्केच उद्दिष्ट गाठले. खासगी बँकांनी तर ८८.४० कोटी उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ११ टक्के म्हणजे ९ कोटी ४७ लाख रुपये वाटप केले.

पीककर्ज वाटप आकडेवारी

लक्ष्यांक १२७५ कोटी

खातेदार १४७९५०

जिल्हा बँक ६०५ कोटी

राष्ट्रीयकृत बँका ४५१.६० कोटी

खासगी बँका ८८.४० कोटी

ग्रामीण बँक १३० कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com