Maharashtra Monsoon Session LIVE: अंबादास दानवेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब! किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून ठाकरे गट आक्रमक

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून वरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
Maharashtra Assembly
Maharashtra Assembly Agrowon

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 :  किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओप्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणावरून विधिमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे एक पेन ड्राईव्ह दिला व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

Maharashtra Assembly
Pavsali Adhiveshan Live updates : विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग ; पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडिओवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

Maharashtra Assembly
Opposition Meeting: विरोधकांच्या बैठकीसाठी शरद पवार बंगळुरुमध्ये दाखल

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सोमय्या व्हिडिओ प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आमच्याकडे आलेली माहिती खरी की खोटी याची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करणार का ?  असा सवाल केला आहे.  

यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. हे प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, असे ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com