Weather Station : राज्यात नव्याने दहा हजार स्वयंचलित हवामान केंद्रे

स्कायमेटने राज्यात २१२७ हवामान केंद्र उभारलेले आहेत मात्र ही हवामान केंद्रे तोकडी पडत असून, सध्याचे वेगवेगळ्या भागातील बदलते वातावरण आणि पावसाची परिस्थिती पाहता अजून हवामान केंद्राची गरज आहे.
Weather Station
Weather StationAgrowon

नगर : राज्यामध्ये शासन ‘स्कायमेट’च्या (Skymet) महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाची माहिती (Weather Information) घेते. स्कायमेटने राज्यात २१२७ हवामान केंद्र (Weather Station) उभारलेले आहेत मात्र ही हवामान केंद्रे तोकडी पडत असून, सध्याचे वेगवेगळ्या भागातील बदलते वातावरण (Changing Climate)आणि पावसाची परिस्थिती पाहता अजून हवामान केंद्राची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील सुमारे दहा हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे निश्‍चित केले आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीने स्वयंचलित हवामान केंद्रे उभी करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेशित केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात हवामान केंद्र उभारणीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. जी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल तेथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Weather Station
Climate Change : हवामान बदलाने संपूर्ण जग जेरीस

राज्यात स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या सेवा पुरवठादार संस्थेच्या महावेध या प्रकल्पांतर्गत महसूल मंडळ स्तरावर एकूण २१२७ स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. याद्वारे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, यायची दिशा. वाऱ्याचा वेग आदी प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहिती उपलब्ध करून पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन या प्रकारच्या विविध उपक्रमांसाठी यासाठी या माहितीचा वापर होत आहे.

सद्यःस्थितीत राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार राज्यांमध्ये दहा हजार स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार राज्यातील २९००० ग्रामपंचायतींपैकी दहा हजार ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत.

Weather Station
Climate Change : वातावरण बदलामुळे उष्णतेचा चटका तीव्र

त्यासाठी हवामान विभागाच्या निकषानुसार ग्रामपंचायतीकडून जागांचा शोध सुरू आहे. याबाबत कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले असून, स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतीची निवड करून त्याचे हद्दीत हवामान केंद्र उभारले जाईल.

त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेशी समन्वय साधून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहा हजार रुपयांचे हवामान केंद्राच्या उद्दिष्टानुसार सर्वाधिक पुणे, जळगाव, नाशिक, नगर, नांदेड, सातारा, यवतमाळ, कोल्हापूर जिल्ह्यांत उभारणार असल्याचे निश्‍चित केले आहे. सध्या पाऊस पडण्याची प्रत्येक गावात वेगवेगळी स्थिती आहे. हवामान केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक गावातील पावसाची अचूक माहिती मिळण्याला अडचणी येत होत्या. आता नवीन हवामान केंद्रे उभी केल्यामुळे ही अडचण दूर होणार आहे.

केंद्रासाठी अशी हवी जागा

- उपलब्ध जागा पाच मीटर बाय सात मीटर असावी. जवळपास मोठा जलाशय, उष्णता स्रोत, दलदल, पाणथळ व उच्च गावाची वीज वाहिनी नसावी.

- स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार असल्याच्या जवळ मोठी झाडे अथवा इमारत असू नये.

- वाऱ्याची दिशा आणि वेग मोजणारा सेन्सर जमिनीपासून तीन मीटर उंचीवर असावा.

- सभोवताली किंवा इमारत प्रकार असल्यास उंचीच्या १० पट अंतरावर सेन्सर उभारण्याची निश्‍चिती करावी

जिल्हा निहाय उभारली

स्वयंचलित हवामान केंद्रे

नगर : ४६९, अकोला : १९३, अमरावती : ३०४, औरंगाबाद : ३११ भंडारा : १९५, बीड : ३६७, बुलडाणा : ३१२, चंद्रपूर : ३०१, धुळे : १९८, गडचिरोली : १६६, गोंदिया : १९८, हिंगोली : २०२, जळगाव : ४१२, जालना : २७९, कोल्हापूर : ३६८, लातूर : २८२, नागपूर : २८०, नांदेड : ४६९, नंदुरबार ः २०८, नाशिक : ४९६, उस्मानाबाद : २२३, पालघर; १७०, परभणी : २५२, पुणे : ५०६ रायगड : २९१, रत्नागिरी ः ३०२, सांगली : २५१, सातारा : ५२६, सिंधुदुर्ग : १५६, सोलापूर : ३६७, ठाणे : १५५, वर्धा : १८६, वाशीम : १७६, यवतमाळ : ४३२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com