Climate Change : हवामान बदलाने संपूर्ण जग जेरीस

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात क्वचितच तीन-चार फलंदाज शतक ठोकतात. मात्र दहा फलंदाजांनी शतक ठोकलं तर? तो सामना आपण विसरू शकणार नाही. हवामान बदलामुळे पर्जन्यमानावर होणाऱ्या परिणामाच्या बाबतीत हे वर्षही आतापर्यंत असंच राहिलं आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

पुणेः हवामान बदलामुळे (Climate Change) जगातील सहाही उपखंडाना झळ बसली. दुष्काळ (Drought), कमी पर्जन्यमान (Rainfall) आणि अतिवृष्टी (Heavy Rainfall) यामुळे महत्वाच्या अन्नधान्य उत्पादक (Food Grain Production) देशांसोबतच चीनसारख्या ग्राहक देशालाही जेरीस आणले. अन्नधान्याचे उत्पादन कमी झाल्याने जगात वेगळीच समस्या निर्णा झाली.

Climate Change
Climate Change : जागतिक हवामान बदल आणि महाराष्ट्रातील शेती

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात क्वचितच तीन-चार फलंदाज शतक ठोकतात. मात्र दहा फलंदाजांनी शतक ठोकलं तर? तो सामना आपण विसरू शकणार नाही. हवामान बदलामुळे पर्जन्यमानावर होणाऱ्या परिणामाच्या बाबतीत हे वर्षही आतापर्यंत असंच राहिलं आहे. केवळ चार-पाच देशांना दुष्काळाचा अथवा अतिवृष्टीचा फटका न बसता त्याची झळ या वर्षी सहाही उपखंडांना बसली. शेतीमालाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या अमेरिका, दक्षिण अमेरिकेतील देशांसोबत प्रमुख ग्राहक असलेला चीनही यामध्ये भरडला गेला.

ऐतिहासिक दुष्काळामुळं चीनमधील यांगत्झी नदीमधील सहाशे वर्षांपूर्वीच्या बुद्धाच्या मूर्ती जगासमोर आल्या. स्पेनमधील वाल्देकानास धरणामधील पाण्याची पातळी कमी झाल्यानं कांस्ययुगीन दगडी स्मारक पुरातत्व शास्त्रज्ञांना पाहायला मिळालं. अनेक दशकांचा विक्रम मोडीत काढणाऱ्या अतिवृष्टीनं पाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत हाहाकार माजवला.

Climate Change
climate change : वातावरण बदलाच्या संकटाचा विळखा

तर दुसऱ्या बाजूला उष्णतेच्या लाटेमुळे युरोपमध्ये वणवे लागले तर भारताचं गव्हाचं उत्पादन जवळपास १०० लाख टनांनी कमी झाल्यानं निर्यातीच्या स्वप्नावर पाणी पडलं. अशा परिस्थितीत जगात शेतमालाचा पुरवठा कमी होऊन अन्नधान्याचा निर्देशांक विक्रमी पातळीपर्यंत गेला नसता तरच नवल. टोकाच्या हवामानाला यावर्षी जोड मिळाली ती रशिया- युक्रेनमधील युद्धाची आणि विविध देशांनी शेतमालाच्या निर्यातीवर टाकलेल्या निर्बंधांची.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत जगाचं शेतीचं चित्र वेगळं होतं. अन्नधान्याची गोदामं काठोकाठ भरून वाहत होती. त्यामुळे जगात २०२२ मध्ये अन्नधान्यांची टंचाई होईल, असं भाकित कोणी करणं शक्य नव्हतं. शेतीमालाच्या पुरवठ्याची बाजू भक्कम असून एखाद्या देशात तुटवडा पडला तरी दुसऱ्या देशातून आयात करून तो खड्डा भरून काढता येईल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र हा विश्वास किती पोकळ होता, हे या वर्षी दिसून आलं.

एकाच वेळी सर्व देशांमध्ये अन्नधान्य उत्पादन घटल्यामुळे यंदा शेतीमालाची पुरवठा साखळी पुरती विस्कटून गेली. या वर्षी ज्या पद्धतीनं विविध देशांमध्ये अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं, दर वाढले आणि त्यानंतर प्रमुख उत्पादक देशांनी महागाई कमी करण्यासाठी निर्यातीवर निर्बंध घातले, ते अनेक बाबतींत विस्मयकारक होतं. अशाच विचित्र हवामानाची पुनरावृत्ती २०२३ मध्ये आणि त्यानंतर २०२४ मध्ये झाली तर? जगातील अनेक देशांची स्थिती चिंताजनक होईल. लोकसंख्येच्या बाबतीत चीनची स्पर्धा करणाऱ्या भारताची अवस्था बिकट होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com