Landslide Crisis : कळवणमध्ये ३० ठिकाणी भूस्खलनाचा धोका

Irhalwadi Landslide : कळवण तालुक्यातील ३० ठिकाणी भूस्खलनाचा धोका असल्याने इर्शाळवाडी (जि. रायगड) प्रमाणे या ठिकाणी विपरित घडण्याआधीच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन दक्ष झाले आहे.
Kolhapur Landslide
Kolhapur LandslideAgrowon
Published on
Updated on

Nashik News : कळवण तालुक्यातील ३० ठिकाणी भूस्खलनाचा धोका असल्याने इर्शाळवाडी (जि. रायगड) प्रमाणे या ठिकाणी विपरित घडण्याआधीच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन दक्ष झाले आहे. तालुक्यातील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथील कुटुंबांना स्थलांतरित करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड, तातीनपाडा, जमाळे, कोसुरडे, भावकुर्डे, देसगाव, खर्डे दिगर, उंबरगव्हान, देवळी, वणी, नांदूर, धोडप माची, पायरपाडा आदी गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात सुमारे २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे गांभीर्य विचारात घेता नाशिक जिल्हा प्रशासनाने देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Kolhapur Landslide
Irshalwadi Landslide : भय इथले संपत नाही

आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार नाशिक, पेठ, दिंडोरी व कळवण या चार तालुक्यांमधील ४३ गावे आणि पाड्यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यात एकट्या कळवण तालुक्यातील ३० ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा या तालुक्यांनाही भूस्खलनाचा धोका संभवतो.

भूस्खलनाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना भूस्खलनाची ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पावसाचा जोर वाढल्यास संबंधित ठिकाणच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारागृहासाठी सामाजिक सभागृहे, मंदिर, शाळा आदी ठिकाणे राखीव ठेवावी, अशा सूचना प्रशासनाने तहसीलदारांना दिल्या आहेत.

Kolhapur Landslide
Irshalwadi Landslide : तर माळीण, तळीये, इर्शाळवाडी वाचले असते

दरम्यान नाशिक जिल्ह्यात जुलैचा तिसरा आठवडा संपुष्टात आला असताना अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे तूर्तास भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांची स्थलांतर करण्यात आलेले नाही. मात्र पावसाचा जोर वाढल्यास तातडीने पावले उचलली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सप्तश्रृंग गडावर दरड कोसळण्याची शक्यता

इर्शाळवाडीसारखी दुर्घटना सप्तश्रृंगी गडावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गडावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी संपूर्ण गाव वसलेले असल्याने तत्काळ संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी १९ जुलै रोजी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com