Agriculture Management : नियोजनातून शाश्‍वत उत्पादन घेता येईल

Agriculture Production : अभ्यासपूर्व नियोजनातून सोयाबीन व उसाचे शाश्‍वत उत्पादन घेता येईल, असे मत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाईचे डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
Agrowon sanvad
Agrowon sanvadAgrowon

Dharashiv News : अभ्यासपूर्व नियोजनातून सोयाबीन व उसाचे शाश्‍वत उत्पादन घेता येईल, असे मत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाईचे डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

तुगाव, ता. जि. धाराशिव येथे बुधवारी (ता. २६) ॲग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोयाबीन व ऊस व्यवस्थापन या कार्यक्रमांमध्ये सोयाबीन व्यवस्थापनामध्ये त्यांनी गोगलगाय, पिवळा विषाणू, तण व्यवस्थापन, खताचे नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन या सोयाबीन बाबतच्या सर्व बाबींवर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

Agrowon sanvad
Agriculture Management : हंगामाच्या पुढे जाऊन शेतीचे नियोजन

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, की ऊस व्यवस्थापनामध्ये लागवडी पूर्वीपासून अभ्यासपूर्व नियोजन करण्याची गरज असून, उसामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, ठिबक सिंचनचा वापर, योग्य नियोजन करून शिफारसी प्रमाणे खतमात्रा देऊन उसाचे चांगले उत्पादन घेता येईल, असे ते म्हणाले. या वेळी उसा बाबतच्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी दिली.

Agrowon sanvad
Agriculture Management : तंत्रज्ञानाच्या आधारे शेती व्यवस्थापन करावे

कोरोमंडलचे डॉ. विनेश रेगे यांनी कंपनीच्या विविध खतांची माहिती देऊन योग्य वेळी खताचा वापर करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना केले. कोरोमंडल इंटरनॅशनलचे विभागीय प्रमुख जितेंद्र कोळपे यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणारे ट्रेनिंग कोरोमंडल कडून शेतकऱ्यांना देऊ त्यासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

या चर्चासत्रास शेतकरी दीपक शेंडगे, विक्रम गोरे, विनोद शेंडगे, बाबासाहेब चव्हाण, शहाजी पाटील, अशोक शेंडगे, पोपट भुतेकर, शंकर लोमटे,कोरोमंडलचे बाबूराव वाघमोडे, जोतिबा माने, रूपेश चौधरी, रामदास सूर्यवंशी, अमर दिवानेसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी बालाजी थोडसरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com