Agriculture Department : कृषिउद्योग महामंडळाच्या निविदांमध्ये संशयकल्लोळ

Agriculture Development Corporation : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाने निविष्ठा खरेदीसाठी काढलेल्या निविदांमध्ये संशयास्पद व्यवहार झालेला आहे.
Food Processing
Food Processing Agrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाने निविष्ठा खरेदीसाठी काढलेल्या निविदांमध्ये संशयास्पद व्यवहार झालेला आहे. यामुळे महामंडळातील एका उपमहाव्यवस्थापकाला पदावरून हटविण्यात आले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांच्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की महामंडळाने २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या एका आदेशात (क्रमांक २०२३/०११९४) कीटकनाशके विभागातील प्रशासकीय कामकाजात तडकाफडकी बदल केले आहेत.

‘‘कीटकनाशके विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीमती ज्योती देवरे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांनी अॅझाडिरेक्टिन (नीमबेस) खरेदीबाबत निविदा प्रक्रिया नियमबाह्यपणे हाताळली आहे. त्यामुळे श्रीमती देवरे यांच्याकडून उपमहाव्यवस्थापकाचा पदभार काढून घ्यावा,’’ असे या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

Food Processing
Agriculture Department : कृषी विभागातील रिक्त पदांमुळे कशी मिळणार गतिमान सेवा?

अॅझाडिरेक्टिनची खरेदीसाठी एक स्वतंत्र निविदा समिती स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्षपद कृषी आयुक्तालयाचे गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांच्याकडे; तर सदस्य सचिवपद महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापिका ज्योती देवरे यांना देण्यात आले होते.

निविदा समितीत कृषी आयुक्तालयाच्या लेखा विभागाचे सहायक संचालक संतोष भांड, महामंडळाचे महाव्यवस्थापक सुजित पाटील व महाराष्ट्र इनसेक्टिसाइड्‍स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी विजय पाथर यांचाही समावेश समितीत आहे. या समितीला डावलून काही निर्णय घेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, की श्रीमती देवरे यांनी उपमहाव्यवस्थापक म्हणून हाताळलेल्या निविदा प्रक्रियेबाबत २१ जून रोजी ज्ञापन (मेमो) देण्यात आले होते.

या ज्ञापनावर त्यांनी २५ जून रोजी खुलासा सादर केला आहे. परंतु हा खुलासा तपासून गुणवत्तेवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे श्रीमती देवरे यांचा पदभार काढावा. माझे पुढील आदेश येईपर्यंत श्रीमती देवरे यांनी फक्त प्रशासन विभागाचे कार्यालयीन कामकाज हाताळावे.

दरम्यान, महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की निविदा प्रक्रियेत श्रीमती देवरे यांनी व्यक्तिशः कोणतीही चूक केलेली नाही. या प्रकरणी नियुक्त केलेल्या समितीने हा निर्णय घेतलेला आहे.

या प्रक्रियेत कृषी खात्याचे अधिकारीदेखील समाविष्ट आहेत. त्यामुळे सर्व खापर एका अधिकाऱ्यावर फोडता येणार नाही. तसेच या प्रक्रियेत शेतकऱ्यांना वेळेत व गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा पुरवठा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची नसून कृषी अधिकाऱ्यांचीही असेल.

Food Processing
Agriculture Corporation : शेती महामंडळाच्या शासकीय जमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट उभारणार

कीटकनाशके विभागाची सूत्रे दुथडेंकडे

महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील कीटकनाशके विभागाचे उपमहाव्यवस्थापक पद आता देवानंद दुथडे यांना तात्पुरते देण्यात आले आहे. ते पशुखाद्य विभागाचे व्यवस्थापक आहेत. या कारवाईमुळे महामंडळात खळबळ उडाली आहे. कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनाही या घडामोडी कळविण्यात आल्या आहेत.

उपमहाव्यवस्थापकाने नेमके काय केले

- निविष्ठा खरेदीची प्रक्रिया ठरविण्याऱ्या उच्चस्तरीय समितीच्या सूचना डावलल्या.

- अटी शर्तींमध्ये कंत्राटदारांना सोयीचे ठरणारे बदल केले.

- वरिष्ठांनी सूचित केल्यानंतरही नियमानुसार निविदा काढली नाही.

- वरिष्ठांनी विचारणा केल्यानंतर नजरचुकीने घडल्याचा खुलासा केला.

- निविदांची तांत्रिक प्रक्रिया पार पाडून घाईघाईने आर्थिक प्रक्रियादेखील पूर्ण केली.

- वरिष्ठांनी न विचारता शेवटी दोन निविदा विचारात घेतल्या.

- दोन्ही निविदा एकाच कंत्राटदाराच्या होत्या. त्यामुळे संशयास्पद व्यवहार उघड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com