Pune APMC : पुणे बाजार समितीच्या अतिरिक्त करवसुलीला स्थगिती

पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील अडत्यांना बिगरशेतसारा आणि देखभाल आकार दरवाढ आकारणीला पणन संचालक विनायक कोकरे यांनी स्थगिती दिली आहे.
APMC Pune
APMC Pune Agrowon

Pune APMC News पुणे ः पुणे बाजार समितीमधील (Pune APMC) भुसार विभागातील अडत्यांना बिगरशेतसारा आणि देखभाल आकार दरवाढ (APMC Tax) आकारणीला पणन संचालक विनायक कोकरे यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्न (APMC Income) वाढीवर मर्यादा येणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीने डिसेंबर महिन्यात बाजारातील सर्व भूखंडधारकांना बिगरशेतसारा ५५ हजार रुपये आणि देखभाल आकार ७२० रुपयांहून पाच हजार इतकी वाढ करण्यात आली आहे.

तसेच त्यापुढे प्रतिवर्षी एक हजार रुपयांनी देखभाल दरवाढ करण्यात येणार नोटिसा दिल्या होत्या. या दरवाढीच्या विरोधात दि पूना मर्चंट चेंबरने राज्याचे पणन संचालक यांच्याकडे अपील दाखल केले होते. बाजार समितीने दिलेल्या आदेशाला पणन संचालकांची स्थगिती दिली आहे.

APMC Pune
Pune APMC Election : बाजार समिती निवडणुकांच्या मतदार याद्यांचा घोळ कायम

मर्चंट चेंबरने केलेल्या अपिलात म्हटले होते, की ही वाढ अन्यायकारक असून, सात पटीने अधिक आहे. नोटीसच्या अनुषंगाने चर्चेसाठी वेळ मिळावा, अशी विनंती देखील बाजार समितीला चेंबरने केली होती. तरीही कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.

अकृषिक कराच्या आकाराच्या वसुलीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. तरीही बाजार समिती सक्तीने वसुली करत आहे.

APMC Pune
Pune APMC : डमी अडत्यांकडून भाडे आकारणी प्रस्ताव धुळखात

चर्चा करून निर्णय घ्यावा...

रजिस्टर्ड भाडेपट्ट्यातील देखभाल खर्चात वाढ करण्याची असल्यास बाजार समिती आणि भूखंड धारकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. तसेच देखभाल आकार आणि बिगरशेतसारा मागणीला स्थगिती देणे आवश्यक असल्याने निर्णयास स्थगिती देत असल्याचे पणन संचालक विनायक कोकरे यांनी घेतलेल्या निर्णय म्हटले आहे.

बाजार समितीच्या कायद्यात सेसच्या उत्पन्नातून सर्व सुविधा देणे आवश्यक आहे. तरीही समितीने व्यापाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता दरवाढ केलेली आहे. कोणताही निर्णय घेताना व्यापारी संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. या विरोधात दि पूना मर्चंट्‍स चेंबरने पणन संचालक यांच्याकडे दाद मागितली होती. त्याला स्थगिती मिळाली आहे.

- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‍स चेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com