Pune APMC Election : बाजार समिती निवडणुकांच्या मतदार याद्यांचा घोळ कायम

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २० मार्चपर्यंत मतदार यादी अंतिम करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
Apmc Election
Apmc ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune PAMC Election Update : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचा (APMC Election) कार्यक्रम जाहीर झाला असून, २० मार्चपर्यंत मतदार यादी (APMC Voter List) अंतिम करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने (Cooperative Election Authority) दिले आहेत.

मात्र विविध बाजार समित्यांमधील विविध वारस नोंदी अडकल्याने मतदार याद्यांबाबत घोळ कायम आहेत. यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मतदार यादीमध्ये नाव येणार की नाही या बाबत मतदार आणि इच्छुक संभ्रमात आहेत.

तर सप्टेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत, कृषी पतसंस्थांसह विविध सहकारी संस्थांच्या झालेल्या निवडणुकांमुळे नव्या मतदारांना संधी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसह विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकांनंतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करता यावे, यासाठी विविध घटकांनी मतदार याद्यांची मागणी निवडणूक प्राधिकरणाकडे केली आहे. यामुळे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे आवश्‍यक झाले आहे.

Apmc Election
APMC, Pune : शंभर कोटींचा भूखंड अडत्यांच्या देण्याचा घाट

या बाबत निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांना आदेश दिले आहेत. यानुसार राज्यातील २४५ बाजार समित्यांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

यामध्ये अनेक दोष असल्याने, पात्र सदस्यांचा समावेश होणे आवश्‍यक आहे, असे आदेश प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी काढले आहेत.

Apmc Election
Pune APMC : पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा

दरम्यान, अनेक बाजार समित्यांमध्ये अनेक आडत्यांनी कोरोना काळात गाळ्यांची विक्री केली, भागीदारी फर्म संपुष्टात आल्या, अनेकांचे निधन झाले.

त्यांची वारस नोंद न झाल्याने परवानाधारक अडत्यांची नावे मतदार यादीत नसल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत.

यामुळे बाजार समितीमध्ये परवानाधारक असून सुद्धा मतदार यादीत नाव नसल्याने निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मतदार यादी कार्यक्रम...

- १० ते १४ फेब्रुवारी २०२३ ः सप्टेंबर २०२२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांचा मतदार यादीत समावेश करणे

- २७ फेब्रुवारी ः सुधारित प्रारूप यादी जाहीर करणे

- ८ मार्चपर्यंत ः हरकती सूचना

- १७ मार्च पर्यंत ः हरकतींवर निर्णय घेणे

- २० मार्च ः यादी अंतिम करणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com