Supriya Sule : शिंदे, फडणवीस सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू

शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर विकास कामांना जरी स्थगिती दिली असली तरी न्यायालयीन लढा सुरू असून या माध्यमातून मंजूर झालेले विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू,’’ अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
Supriya Sule
Supriya SuleAgrowon
Published on
Updated on

शिर्सूफळ, ता. बारामती ः ‘‘शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadanvis Government) मंजूर विकास कामांना जरी स्थगिती दिली असली तरी न्यायालयीन लढा सुरू असून या माध्यमातून मंजूर झालेले विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू,’’ अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली.

Supriya Sule
Soybean : दीड लाखांची भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

बारामती तालुक्यातील कटफळ, गाडीखेल, साबळेवाडी, पारवडी, सिद्धेश्वर निंबोडी, जैनकवाडी, सावळ येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी गावसंपर्क दौरा आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, संबंधित गावचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी महाविकास आघाडी सत्ता गेल्यानंतर बारामती तालुक्यातील विकासकामे निधी अभावी रखडली असल्याचे सांगत रखडलेली विकास कामांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना ग्रामस्थांनी विचारले असता, न्यायालयीन लढा चालू आहे. रखडलेली सर्व विकासकामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

Supriya Sule
Cotton Rate : ‘पणन’ची ५० केंद्रांवरच कापूस खरेदी

तसेच शिर्सूफळ येथील गावातील सौर ऊर्जा प्रकल्पात जे बाहेरील कामगारांची भरती होती. त्याऐवजी स्थानिक प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच काही ठिकाणी करण्यात आलेली विकासकामे दर्जेदार झाली नसल्याचे काही ग्रामस्थांनी खासदार सुळे यांच्या निदर्शनात आणून दिले. यांसह शिर्सुफळ येथील रेल्वे भुयारी मार्गावर अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. याकडे अनेक वेळा मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने याबाबतचे निवेदन देण्यात आले.

यावर खासदार सुळे यांनी सर्व विषयावर संबंधित विभागाशी चर्चा करून जलद गतीने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच संबंधित गावातील सवांदावेळी ग्रामस्थांनी आपल्या भागातील अडीअडचणी मांडल्या.

कटफळ, गाडीखेल, साबळेवाडी, पारवडी, सिद्धेश्वर निंबोडी, जैनकवाडी, सावळ येथील ग्रामस्थांनी आपल्या आपल्या भागातील समस्या खासदार सुळे यांच्यापुढे समस्या मांडल्या. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने कटफळ येथील जानाई देवी, शिर्सूफळ ग्रामदेवता शिरसाई देवी, जैनकवाडी येथील जा देवीचे दर्शन घेत पूजा केली. तसेच सिद्धेश्वर निंबोडी येथे विकास कामांचा शुभारंभ केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदार संघात दौरा करून भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. यानंतर लगेचच खासदार सुळे यांनी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा दौरा केलेले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com