Post Harvest Management : पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे

बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.
Supriya Sule
Supriya SuleAgrowon
Published on
Updated on

Baramati News Update बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट (Post Harvets Management) प्रकल्पांसाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारकडे केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून तसे लेखी पत्रही त्यांनी दिले.

बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये ‘पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प’ उभारण्यात येणार असून, कृषी विभागाच्या वतीने तसा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Supriya Sule
Agriculture Drone : विद्यापीठात लवकरच ड्रोन विषयक विविध अभ्यासक्रम

हा प्रकल्प सुरू झाल्यास या चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असून, शेतीमाल, भाजीपाला, फळे आदींवर प्रक्रिया करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे या मालाला योग्य भाव मिळेल. तसेच या भागात रोजगार निर्मितीलाही बळ मिळेल.

Supriya Sule
Agriculture : रानातील धुक्यात न्हाली पहाट ओली

त्यातून या भागातील शेतकरी व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे खासदार सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

या प्रकल्पांसाठी येणाऱ्या खर्चात केंद्र सरकार ९० टक्के (१८५७.६९ लाख) तर उर्वरित १० टक्के (२०६.४ लाख) वाटा राज्य सरकार उचलणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी गोयल यांच्याकडे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com