Agriculture : रानातील धुक्यात न्हाली पहाट ओली

Team Agrowon

समोरचं प्रसन्न वातावरण पाहून आणखीच प्रसन्न झालो. गोदावरी नदीच्या बंधाऱ्याचा पाणी परतावा बरबड्यापर्यंत आलेला आहे.

Agriculture | Indrjeet Bhalerao

समोर अथांग पाणीच पाणी दिसत होतं. सगळीकडं धुकं पसरलेलं होतं. त्यामुळे वातावरण एकदम थंड. रात्रीही थंडीनं चुणूक दाखवली होती.

Agriculture | Indrjeet Bhalerao

तीन पांघरूनं घेऊनही थंडी ऐकत नव्हती. ती थंडी आता बाहेर आणखीच जाणवत होती. पण या प्रसन्न वातावरणात फिरण्याची मजाही वाटत होती.

Agriculture | Indrjeet Bhalerao

आम्ही परताव्याच्या पाण्यावरचा पूल ओलांडून काल जिथं हुरडा पार्टी केली त्या दिलीपराव धर्माधिकारी यांच्या शेताकडंच निघालो होतो. पण मध्येच एक पांदण दिसली, त्या पांदणीत शिरलो.

Agriculture | Indrjeet Bhalerao

त्या पांदणीतून जाताना मोरांचा एक थवा पांदण ओलांडून या रानातून त्या रानात उडत जाताना दिसला. आणि मन मोरपंखी झालं.

Agriculture | Indrjeet Bhalerao

थोडं पुढं चालत गेल्यावर पांदणीला एक पायवाट फुटलेली दिसली. आम्ही पुन्हा पांदण सोडली आणि त्या पायवाटेनं रानात शिरलो. ज्वारीच्या शेतातून चाललो. सूर्य नुकताच उगवू लागला. .

Agriculture | Indrjeet Bhalerao
Agriculture | Agrowon