Onion Cultivation : खानदेशात उन्हाळ कांदालागवड सुरू

क्षेत्र कमीच राहणार असल्याचा अंदाज
 Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः खानदेशात उन्हाळ कांद्याची (Summer Season) किंवा रब्बीमधील कांद्याची लागवड सुरू झाली आहे. यंदा क्षेत्र आठ हजार हेक्टरवर राहील, असे दिसत आहे. लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या होत्या. त्यातून रोपे उपलब्ध करून घेतली जात आहेत.

 Onion Cultivation
Onion Cultivation : निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड सुरू

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, यावल, चोपडा, जळगाव या भागात उन्हाळ कांदा अधिक असतो. धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा आणि नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार भागात उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे. या भागात काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका अधिकच्या तयार केल्या होत्या. त्यातून रोपांची विक्रीही काही शेतकरी करीत आहेत.

५० फूट बाय तीन फूट आकाराच्या सरीमधील कांदा रोपांची एक ते दीड हजार रुपयांत विक्री केली जात आहे. शेतकरी गरजेनुसार कांदा रोपांची खरेदी करीत आहेत. धुळ्यातील लामकानी, कापडणे, शिंदखेड्यातील टाकरखेडा, जातोडा आदी भागात दर्जेदार कांदा रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जळगावमधील यावल तालुक्यातील किनगाव, चोपड्यातील अडावद भागात रोपे विक्री सुरू आहे. उन्हाळ कांद्याची लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार हेक्टरवर होईल. धुळ्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर आणि नंदुरबारत सुमारे दीड हजार हेक्टरवर कांदा लाागवड अपेक्षित आहे.

 Onion Cultivation
Onion Rate : उन्हाळ कांद्याच्या दराची कोंडी कायम

यंदा लागवड काहीशी कमी राहणार आहे. कारण मागील दोन हंगाम कांद्याला दर हवे तसे नाहीत. मागील एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत कांद्याचे दर दबावात होते. मध्यंतरी किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये दरात सुधारणा झाली होती. परंतु पुन्हा दर कमी झाले. सध्याही कमाल दर १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. यामुळे शेतकरी लागवड कमी करीत आहेत. लागवड कमी करून कलिंगड, मका आदी पिकांची लागवड काही कांदा उत्पादकांनी केली आहे. कलिंगडाचे पीक ६० ते ६५ दिवसात येते. तर मका पिकाचे कमी खर्चात किंवा कांदा पिकापेक्षा कमी खर्चात उत्पादन हाती येते.

शिवाय चाराही मिळतो. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याचे दिसत आहे. कांद्याची लागवड १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी कमी दिवसात येणाऱ्या कांदा बियाण्याला पसंती दिली आहे. यंदा कांदा बियाणे मुबलक होते. त्याला हवा तसा उठाव नव्हता. यामुळे बियाणे दर बाजारात किंवा कृषी केंद्रात कमाल १५०० ते १६०० रुपये प्रतिकिलो, असे होते. काही कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांनी १८०, २००, ३०० ते ४०० रुपये प्रति किलो या दरात कांदा बियाण्याची विक्री जळगाव, चोपडा, यावल भागात केली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com