Anil Jadhao
नाशिक जिल्ह्यात प्रमुख लासलगाव बाजार समितीत एप्रिल महिन्यात नवीन माल निघाल्यानंतर उन्हाळ कांद्याला सरासरी ९७८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
सुरुवातीलाच उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याची स्थिती होती. मे महिन्यात त्यात घसरण होऊन ८३९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
जून महिन्यापासून सुधारणा दिसून आली. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात दरात घसरण झाली. त्यांनतर सप्टेंबर महिन्यात काहीशी आवक कमी झाल्याने दरात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल १,३९२ रुपये दर मिळाला.
पुढील टप्प्यात साठा संपुष्टात येत असताना दरात सुधारणा होऊन ऑक्टोबर महिन्यात १,८८२ रुपये तर नोव्हेंबर महिन्यात १,९१४ रुपये दर मिळाला. मात्र अंतिम टप्प्यात पुन्हा दरात घसरण झाली आहे.
सप्टेंबर महिन्यानंतर आवक कमी होत असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात उन्हाळा कांद्याला दराचा दिलासा मिळाला. मात्र नंतर पुन्हा खरीप लाल कांद्याची आवक हळूहळू सुरू झाल्यानंतर उन्हाळ कांद्याची मागणी कमी झाल्याने दराला फटका बसला.