Sugarcane Farming : सातारा जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर ऊस

ऊस गळीत हंगाम सुरु होण्यास महिना बाकी असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक लाख सात हजार हेक्टरवरील ऊस गाळपास तयार आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

सातारा : ऊस गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) सुरु होण्यास महिना बाकी असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळपाची (Sugar Factory's Prepare For Sugarcane Crushing) तयारी केली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक लाख सात हजार हेक्टरवरील ऊस गाळपास (Sugarcane Crushing) तयार आहे. काही कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्याने वाढलेल्या क्षेत्रातील ऊस गाळप होण्यास मदत होणार आहे. जावळी तालुक्यातील ‘प्रतापगड’, वाई तालुक्यातील ‘किसन वीर’ व खंडाळा तालुक्यातील खंडाळा कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास या तालुक्यातील उसाचा प्रश्न मिटेल.

Sugarcane
Sugarcane Season : राज्यात गळीत हंगाम एक ऑक्टोबरपासून

जिल्ह्यात उसाचे सर्वसाधारण क्षेत्र ८६ हजार ४० हेक्टर आहे. प्रत्यक्षात एक लाख सात हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. गेल्यावर्षी ‘किसन वीर’, ‘खंडाळा’ व ‘प्रतापगड’ या तीन कारखान्यांनी गाळप केले नाही. उर्वरित १३ साखर कारखान्यांनी गाळप केले. पण, तीन कारखाने बंद राहिल्याने या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना गाळपास पाठवावा लागला. तेथे शेतकऱ्यांची अडवणूक झाली. कऱ्हाड, सातारा, फलटण, कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक ऊस उपलब्ध आहे. कऱ्हाड तालुक्यात २६ हजार १४० हेक्टर, सातारा १९ हजार ७१०, फलटण १९ हजार ५६४, कोरेगाव तालुक्यात १२ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे.

Sugarcane
Sugarcane Cultivation : थेट शिवारातून करता येणार उसाची नोंदणी

‘एफआरपी’चे तुकडे होणार?

या वर्षीही एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. गेल्या हंगामात कारखान्यांनी दोन टप्प्यात एफआरपीची रक्कम दिली होती. पण वाढलेली एफआरपी लक्षात घेता एकरकमी एफआरपी मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तालुकानिहाय उसाचे क्षेत्र

तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)

सातारा १९ हजार ७१०

जावळी ९१९

पाटण एक हजार २४०

कऱ्हाड २६ हजार १४०

कोरेगाव १२ हजार ९११

खटाव ८ हजार ७४३

माण एक हजार ८७७

फलटण १९ हजार ५६४

खंडाळा ४ हजार ४४६

वाई ६ हजार ४५०

‘एफआरपी’चे तुकडे होणार?

या वर्षीही एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. गेल्या हंगामात कारखान्यांनी दोन टप्प्यात एफआरपीची रक्कम दिली होती. पण वाढलेली एफआरपी लक्षात घेता एकरकमी एफआरपी मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com